माढा सोलापूर जिल्हा

टणू ते चांदज रस्त्यासह भीमा नदीवरील पुलासाठी नाबार्ड मधून 25 कोटी निधी मंजूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टणू ते चांदज रस्त्यासह भीमा नदीवरील पुलासाठी नाबार्ड मधून 25 कोटी निधी मंजूर

माढा / प्रतिनिधी – इंदापूर तालुक्यातील टणू ते माढा तालुक्यातील चांदज या दोन गावांना जोडणारा रस्ता व त्याच रस्त्यावर भीमा नदीवरील पुलासाठी नाबार्ड मधून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांनी शासन दरबारी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नातून 25 कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.

टणू व चांदज या दोन गावांच्या मधून भीमा नदी वाहते त्यामुळे माढा तालुक्यातील कोंढार भागातील आढेगाव,वडोली,रांझणी,टाकळी व नगोर्ली आणि इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर,टणू,पिंपरी बु.,गिरवी या गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी सुमारे 10 किमी वळसा घालून जावे लागत आहे त्यामुळे या भागातील लोकांची अनेक वर्षांपासून मागणी होती.या भागात ऊस व विविध फळबागांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मालाची ने-आण करताना शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती.

या भागातील विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी शाळेला ये-जा करताना मोठी गैरसोय होत होती .आदी बाबी लक्षात घेऊन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

हेही वाचा – छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते रेश्मा दास यांच्या ‘सुमी” पुस्तकाचे प्रकाशन

रेल्वे प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना यश;कोईमतूर – कुर्ला रेल्वे गाडीला जेऊर येथे एका दिवसासाठी थांबा

या प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाच्या नाबार्ड अंतर्गत या दोन गावांना जोडणारा रस्ता व भीमा नदीवरील पुलासाठी हा भरीव निधी मंजूर झाला आहे.हा निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतर माढा व इंदापूर हे दोन तालुके या मार्गाने जोडले जाणार आहेत त्यामुळे या भागातील दळणवळणाची यंत्रणा वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

फोटो ओळी- 1) खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर.

2) आमदार बबनराव शिंदे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!