करमाळा सोलापूर जिल्हा

सालसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सालसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

करमाळा प्रतिनिधी –
सालसे ता.करमाळा येथे सिद्धार्थ तरुण मंडळ,सालसे च्या वतीने विश्वरत्न, महामानव, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि.२६/०४/२०२५ रोजी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन, सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला व लहान मुले सहभागी झाली होती. लेझीम पथकाने बाबासाहेबांच्या गाण्यावर आपली लेझीम सादर केली. यावेळी बाबासाहेबांच्या गाण्यावर सर्व पुरुष महिला यांनी ठेका धरला होता. त्यानंतर ख्यातनाम गायक विजय सरतापे व त्यांच्या टीमचा भीम – बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक गाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी रिपाई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश दादा कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू ओहोळ, पंचायत समिती मा.सभापती शेखर तात्या गाडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते यशपाल दादा कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जालिंदर गायकवाड,भारतीय बौद्ध महासभा मा.जिल्हाध्यक्ष व महाविहार निर्माण समिती अध्यक्ष राजेंद्र कुमार निकाळजे, मा.नगराध्यक्ष दिपक ओहोळ,उद्योजक बाबासाहेब बोडखे,सरपंच सतिश ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार सर,बौद्धाचार्य सावताहरी कांबळे,सुहास ओहोळ,संभाजी गोसावी सर,अळसुंदे पोलीस पाटील कमलेश ओहोळ व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा – पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा केत्तूर येथील नेताजी प्रशालेत निषेध

जिल्हास्तरीय सैनिक कुटुंबीय संरक्षण समितीमधे करमाळ्याचे ऑनररी कॅप्टन अक्रूर शिंदे यांची निवड

यावेळी केलेल्या भाषणात दिपक ओहोळ सर यांनी बाबासाहेबांचे देशाप्रती असलेले योगदान व बाबासाहेबांचे कार्यपुढे न्यायची आपली जबाबदारी याविषयी मनोगत व्यक्त केले.शेवटी स्नेह भोजनाने व बाबासाहेबांचे कार्य पुढे घेऊन जायचे या ध्येयाने कार्यक्रमाचे सांगता झाली.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!