क्राइमसोलापूर जिल्हा

“तुमचा वंशजच शिल्लक ठेवत नाही” अशी धमकी देत काकाने पुतणीला संपवलं; घटनेनं सोलापूर हादरलं

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 “तुमचा वंशजच शिल्लक ठेवत नाही” अशी धमकी देत काकाने पुतणीला संपवलं; घटनेनं सोलापूर हादरलं 

 “माझ्या आईच्या नावावरील शेतजमीन माझ्या नावावर करून न देण्यासाठी तुम्ही दोघे नवरा बायकोच जबाबदार आहात”. याचा राग मनात धरुन “तुमचा वंशजच शिल्लक ठेवत नाही”, अशी धमकी देत सख्ख्या भावाच्या ४ वर्षाच्या चिमुरडीची काकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झोपेत असलेल्या पुतणीचं तोंड आणि नाक दाबून ही हत्या केली.

त्यानंतर पुतणीचा मृतदेह मलिकपेठ येथील सिना नदीच्या पात्रात पाण्यात टाकून दिला. वाटणी होऊन शिल्लक राहिलेल्या सहा एकर शेतजमिनीसाठी नात्याला काळीमा फासणारी ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथे २० फेब्रुवारीला सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यशोदीप शिवाजी धावणे (वय ३२) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत यशोधन शिवाजी धावणे यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील यशोधन शिवाजी धावणे हे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची गावाच्या कडेला एकूण १६ एकर जमीन आहे. त्यापैकी स्वत: यशोधन यांच्या नावावर पाच एकर आणि भाऊ यशोदीप याच्या नावावर पाच एकर व राहिलेली सहा एकर शेतजमीन आईच्या नावावर आहे. भाऊ यशोदीप हा गेल्या तीन वर्षांपासून आईच्या नावावर असलेली सहा एकर जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करून देण्यासाठी घरातील सर्व लोकांना त्रास देत होता. गावातील प्रतिष्ठित लोकांनी व नातेवाईकांनी त्याला वेळोवेळी बैठक बसवून “तुमचे आई वडील असेपर्यंत त्यांच्या नावावर राहू दे. नंतर ते सहा एकर तुम्हा दोघं भावांच्याच नावावर होणार आहे आणि आम्ही करून देऊ”, असे गावातील प्रतिष्ठित लोकांनी वेळोवेळी सांगून देखील यशोदीपच्या मनात राग होता.

२० फेब्रुवारीला सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास यथोधन, पत्नी योगीता आणि आई हे शेतातील कामे करण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी यशोधन यांची मुलगी घरात झोपलेली होती. शेतातील काम करून सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास यशोधन घरी आले असता त्यांना त्यांची मुलगी घरात दिसली नाही. तेव्हा यशोधन यांनी सर्वांना फोन करुन चौकशी केली असता ती कुठेही दिसून आली नाही.

यशोधन यांनी भाऊ यशोदीप याला फोन लावून “मुलगी घरात नाही. कुठे आहेस तू मुलीला पाहिलस का?, असं विचारले असता त्याने “मी तुझ्या मुलीला ठार मारून मलिकपेठ येथील सिना नदीपात्रात पाण्यात टाकून”, दिल्याचे सांगितले. घाबरलेल्या बापाने दुचाकीवरुन मलिकपेठ गाठत सिना नदीचे पुलावरून नदीत पाहिले असता मुलगी पाण्यावर तरंगत दिसली. मोहोळ पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करत आरोपी यशोदीपला ताब्यात घेतलं आहे.

litsbros

Comment here