करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात हजारो शिवचरित्रांचे वाटप करून पुरोगामी विचारांचा जागर करणारी शिवजयंती संपन्न; सर्वत्र चर्चा
केत्तूर(अभय माने) डॉल्बीचा दणदणाटासह मिरवणूकांचा अनाठायी खर्च टाळून मांजरगाव (ता.करमाळा) ग्रामस्थांनी शिवजयंतीनिमित्त प्रबोधनाला प्राधान्य देवून गेली अनेक वर्षे विचारांचा जागर सुरू ठेवला आहे. 2023 च्या शिवजयंती उत्सवात कुमारी सनोबर पठाण यांनी आपल्या अत्यंत ओजस्वी वाणीने छत्रपती शिवरायांचा सर्वधर्मसमभाव विशद करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मांजरगाव आणि मांजरगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी वक्त्यांची प्रेरणादायी भाषणे उपस्थित श्रोत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटविणारी ठरली.
मांजरगावची शिवजयंती ही पुरोगामी विचारांची मेजवानी ठरली असून समाजाला एक नवीन दिशा देणारी आहे असे मत मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष प्राचार्य नागेश माने व सचिन काळे तसेच जयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा.अभिमन्यू माने,प्रा.गौतम खरात व परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केले.
बारा गावातील अठरापगड जातबांधवांनी शेकडोंच्या संख्येने शिवजयंती निमित्त एकत्र येऊन मांजरगावमध्ये घडवून आणलेला विचारांचा जागर आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांचे बळ वाढवणारी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा.डॉ. संजय चौधरी यांनी व्यक्त केली.
प्रा.नंदकिशोर वलटे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लोकनियुक्त महिला सरपंच स्वाती संतोष पाटील यांनी व्याख्यात्या कुमारी सनोबर पठाण यांचा सन्मान केला. गोविंद खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिवजयंतीच्या या व्याख्यानासाठी डॉ.अमोल दुरंदे,राजेंद्र भोसले , मारुती साखरे , विजय निकत, श्रीमंत चौधरी , राजाभाऊ कदम, संभाजी रिटे, दादासाहेब कोकरे, झुंबर तात्या झोळ, चंद्रकांत कुंभार ,सुनील सरडे, जालिंदर कोकरे, पत्रकार विजय निकत, सुयोग झोळ, संभाजी ब्रिगेडचे अमोल घोगरे, रसूल शेख, गोरे गुरुजी , सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे आदी मान्यवरांसह रिटेवाडी, उमरड, सोगाव पूर्व सोगाव पश्चिम, वाशिंबे, पोंधवडी, राजुरी, उंदरगाव, सावडी या गावांमधून शेकडो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवरत्न तरूण मंडळ, शिवजयंती उत्सव समिती व नागलोक बौद्ध विहार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिवजयंतीनिमित्त प्रा.आ.केंद्र कोर्टी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.
Comment here