केमशैक्षणिक

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

केम – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री गणेश जाधव हे प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष कदम हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री गणेश जाधव यांनी आजच्या भौतिक जगात वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगून जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास सांगितला . त्यांनी या उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना दररोज आवडत्या ग्रंथातील दोन पाने अवांतर वाचन करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्राचार्य श्री सुभाष कदम यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये पुस्तकांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी कु. राजनंदिनी जगताप, कु.सायली बिचीतकर, कु.दिशा तळेकर, कु. चंदना तळेकर, कु.सानिया पठाण, कु.रसिका डुकळे, कु. ईश्वरी तळेकर, कु. विद्या कांबळे, कु. सुवर्णा कारंडे या विद्यार्थिनींनी त्यांच्या संग्रही असलेल्या, त्यांना आवडलेल्या ग्रंथातील उताऱ्याचे प्रकट वाचन केले.

हेही वाचा – कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

आपली मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घ्यावी : समाजप्रबोधनकार प्रबोधनकार ॲड . डॉ.बाबुराव हिरडे

या प्रकट ग्रंथ उतारा वाचनाचा सर्व पाहुण्यांनी, सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.
या कार्यक्रमास प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, सहदेव घुगे उपस्थित होते.

litsbros