माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

चांगले मित्र व दर्जेदार पुस्तके जीवनाला योग्य दिशा देतात – अध्यक्ष राजेंद्र गुंड पुण्याच्या संस्थेकडून संत गाडगेबाबा विद्यालयास 6 हजारांची पुस्तके भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चांगले मित्र व दर्जेदार पुस्तके जीवनाला योग्य दिशा देतात – अध्यक्ष राजेंद्र गुंड

पुण्याच्या संस्थेकडून संत गाडगेबाबा विद्यालयास 6 हजारांची पुस्तके भेट

माढा / प्रतिनिधी- प्रत्येकाला जीवनात संस्कारक्षम,सुसंस्कृत, निर्व्यसनी,ज्ञानी व अभ्यासू मित्र मिळणे आवश्यक आहे.जीवन आनंदी व कृतार्थ होण्यासाठी दर्जेदार पुस्तके व साहित्याचे वाचन करायला हवे.पुस्तक प्रेमी मनुष्यच सर्वाधिक श्रीमंत समजला जातो.ज्यांच्या नशिबात या दोन्ही बाबींचा सहवास लाभतो ते जीवनात नक्कीच यशस्वी व समाधानी होतात म्हणजेच चांगले मित्र व दर्जेदार पुस्तके जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम करतात असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिक्षक महासंघाचे माढा तालुकाध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी केले.

ते आनंदनगर-मानेगाव ता.माढा येथे श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयास विठ्ठलवाडीचे शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गुंड यांच्या प्रयत्नातून पुणे येथील युनिक फीचर्स व समकालीन प्रकाशन संस्थेच्या वतीने 6 हजारांची 36 प्रेरणादायी पुस्तके भेट देताना बोलत होते.

पुढे बोलताना आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड म्हणाले की,सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे ही बाब निश्चितच गंभीर व चिंताजनक आहे.विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार पुस्तके व साहित्याचे वाचन करण्याची आवड व गोडी निर्माण होण्यासाठी पालक व शिक्षकांनी कृतियुक्त प्रयत्न केला पाहिजे.ही दर्जेदार व प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थी व शिक्षकांच्या ज्ञान व माहितीत भर पडावी यासाठी खूपच उपयुक्त आहेत.पुणे येथील युनिक फीचर्स व समकालीन प्रकाशन संस्थेच्या वतीने जागर वाचनाचा हा वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने हाती घेतलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

राजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नावलौकिक कमावला – उपाध्यक्ष सज्जनराव जाधव आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा सत्कार

सहशिक्षक सुनील खोत यांनी सूत्रसंचालन केले.आभार शिवाजी भोगे यांनी मानले.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके,तुकाराम कापसे, शिवाजी भोगे,तनुजा तांबोळी, सुनील खोत,सचिन क्षीरसागर, सुधीर टोणगे,सागर राजगुरू,लहू गवळी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी- आनंदनगर-मानेगाव ता.माढा येथील श्री संत गाडगेबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडे पुस्तके सुपुर्त करताना शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गुंड बाजूला शिक्षक व विद्यार्थी.

litsbros