करमाळासोलापूर जिल्हा

उजनीचा पाणीसाठा अत्यल्प : पोहण्याला लागला ब्रेक* गाळाचे प्रमाण जास्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीचा पाणीसाठा अत्यल्प : पोहण्याला लागला ब्रेक
गाळाचे प्रमाण जास्त

 

केत्तूर ( अभय माने) दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा तसेच प्राथमिक व माध्यमिक परीक्षाही संपल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढली त्यानंतर होणारी अंगाची लाही लाही शमविण्यासाठी व शरीराला गारवा मिळावा म्हणून विहीरीत, उजनी पाणलोटक्षेत्र, पाझर तलाव या ठिकाणी दुपारच्यावेळी लहानापासून जेष्ठापर्यंत सर्वजण पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असताण दिसत असतात परंतु यावर्षी सर्वत्र पाणीटंचाई असल्याने पोहोणाराना ब्रेक लागला आहे.

दुपारी बारा ते चार च्या दरम्यान मुले उजनी लाभक्षेत्र परिसरात तसेच विहिरीवर डुंबत असतात तर कोणी पोहायला शिकवत असतात. लहानांबरोबर तरुण व जेष्ठही पोहोण्याचा आनंद लुटत वेगवेगळ्या युक्त्या वापरून मुलांना पोहायला शिकवत आहेत.

परंतु, यावर्षी पाऊस कमी झाल्याने आणि उजनी धरणात फक्त 60 टक्के पाणीसाठा झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने या परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे तर काही विहिरी कोरड्याफट पडलेल्या आहेत. उजनी जलाशयही तळाशी गेल्याने गाळ व दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना पोहायला जाणे अवघड झाले आहे.परिणामी विद्यार्थीवर्गस नदीकाठी पोहोण्यास न जाण्याचा सल्ला वडीलधाऱ्याकढून दिला जात यावर्षी आहे.तरीही उजनी जलाशयात पोहण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. कारण पाणी कमी आहे व गाळाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे गाळात रुतून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे यावर्षी पोहोण्याला मात्र ब्रेक बसला आहे. लहान बच्चे कंपनी मात्र शेतीसाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकित डुंबत असून पोहण्याचा आनंद घेत आहेत.

हेही वाचा – जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात,,,,,, वीज बिल थकल्यामुळे वीज महामंडळाने केले वीज कनेक्शन बंद संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

” दरवर्षी उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून आम्ही उजनी जलाशयात पोहायला जातो.नवीन नवीन मुलांना पोहायला शिकवतोही परंतु, यावर्षी जलाशयात पाण्याचे प्रमाण अत्यल्प झाल्याने व गाळाचे प्रमाण जास्त असल्याने असल्याने धोका होऊ शकतो म्हणून पोहणे टाळले आहे.
– संताजी बाबर, हिंगणी (करमाळा)

” यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत उजनी जलाशयात पोहायला शिकायचे होते परंतु,उजनीमध्ये पाणी कमी असल्याने शिकता येणार नाही.असे असले तरी घराजवळ शेतीसाठी बांधलेल्या हौदात दुंबने पसंत करीत आहे.
-स्वराज बाबर,करमाळा

litsbros