करमाळाराज्यसोलापूर जिल्हा

एसटी बसवरून नेते गायब; गाड्या झाल्या चकाचक, आदर्श आचारसंहितेचा परिणाम!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

एसटी बसवरून नेते गायब; गाड्या झाल्या चकाचक,
आदर्श आचारसंहितेचा परिणाम!

केत्तूर (अभय माने) लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा परिणाम म्हणून एसटी बसवर असणाऱ्या सर्व शासकीय जाहिराती,व राजकीय नेत्यांच्या छबी असल्याने या सर्व जाहिराती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने काढून टाकल्या आहेत. त्यामुळे एस टी बसेस मात्र पूर्वीसारख्या टकाटक दिसू लागल्या आहेत.सर्वसामान्य प्रवाशातून याचे स्वागत करण्यात येत आहे.

एसटी बसवरील शासकीय जाहिरातीमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्य मंत्र महोदयाच्या छबी जळकत असतात यश शासकीय जाहिरातीमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार होते हे जाणून एसटी महामंडळाने या सर्व जाहिराती काढून टाकलेल्या आहेत. त्यामुळे एसटी बस मात्र जाहिरात मुक्त झालेल्या आहेत.

हेही वाचा – शेलगाव(क)च्या लेकीची कृषिसेवक पदी नियुक्ती; राज्यात चौथा क्रमांक, सर्वत्र कौतुक

आचारसंहिता सुरू झाली अन चौक, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर तीन-चार महिन्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.म्हणजे दिवाळीपर्यंत तरी एसटी बस विना जाहिराती दिसणार आहेत.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर कोणत्याही प्रकारच्या शासकीय जाहिराती नकोतच… ही माफक माफक अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशातून केली जात आहे. परंतु,राज्यकर्त्यांना कोण आणि कसे समजावणार ? हाही मोठा प्रश्नच आहे.

litsbros