वाशिंबेतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता;नामवंत किर्तनकांरानी बजावली सेवा
वाशिंबे (सचिन भोईटे):- ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान वाशिंबे (ता.करमाळा)येथे अष्टमीनिमित्त अखंड हरिनाम,सप्ताह नामजप व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली.भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त भव्य दिपोत्सव साजरा केला.व जन्मोत्सवाची हरी किर्तन सेवा ह.भ. प.श्री.अशोक महाराज जाधव (नारायणगाव) यांची झाली.विविध विषयांवर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सात दिवस कीर्तने झाली.
ह.भ.प.गायनाचार्य माऊली महाराज झोळ यांच्या काल्याचे किर्तन सेवेने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महाराजांनी आपल्या किर्तन सेवेत जीवन जगत असताना कसे जगावे, प्रपंच आणि परमार्थ कसा करावा, जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे ते मिळवण्यासाठी काय केले पाहिजे.अनेक महापुरुष संतांची उदाहरणे देत सत्य मार्गाने चालण्याचा संदेश दिला.व आपल्या वाणीतून उपस्थितांना ज्ञानमृत पाजले. कार्यक्रमास महिलावर्ग मोठ्यां संख्येंने उपस्थित होता.
अन्नदान सेवा ही बोबडे,निमकर,श्रीमंत झोळ परिवारांकडून पाच हजार लोकांची भोजन महाप्रसाद पंगत झाली.कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट समिती,समस्त ग्रामस्थ,भजनी मंडळ यांनी केले.
Comment here