करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

शेतकरी विरोधी मोदी सरकारला हटवणे आज गरजेचे; वाचा करमाळयात नेमकं काय म्हणाले शरदचंद्रजी पवार ?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 शेतकरी विरोधी मोदी सरकारला हटवणे आज गरजेचे; वाचा करमाळयात नेमकं काय म्हणाले शरदचंद्रजी पवार ?

 करमाळा(प्रतिनिधी अलीम शेख);
शेतकऱ्यांच्या शेतमालाला आज भाव नाही अशा शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र शासनाला हटवणे गरजेचे आहे असे देशाचे माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार यांनी आज करमाळा येथे बोलताना आपले मत व्यक्त केले.

पवार हे आज माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा येथे आले असता ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील उपस्थित होते

देशाचे मा. कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार बोलताना पुढे म्हणाले की आज देशात हुकूमशाही सरकार असून अशा या हुकूमशाही सरकारला आज हटवणे गरजेचे आहे मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या अनेक मंत्र्यांना आज मोदी सरकार तुरुंगात पाठवण्याचे काम करीत आहे अशा या हुकूमशाही सरकारला देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी प्रतिपादन देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार बोलताना म्हणाले आणखीन बोलताना पवार पुढे म्हणाले की आज शेतकऱ्यांच्या दुधाला तसेच साखर याशिवाय कांदा या पिकाला कोणतेही भाव नाही अशा या शेतकरी विरोधी सरकारला आपण येत्या सात मे ला विरोधी मतदान करून मोदी शासनाला हटवणे आता मतदाराच्या हातात आहे

सन 1972 मध्ये मी या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्याकाळी मला जिल्ह्याचे नेते कै. नामदेवराव जगताप, कै शंकरराव मोहिते पाटील, कै. औदुंबर पाटील तसेच कै. विठ्ठलराव शिंदे आदी नेत्यांच्या मला राजकीय सहवास लाभला असे पवार बोलताना म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार नारायण आबा पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रोहित पवार, माजी आमदार उत्तमराव जानकर, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे प्रांतिक अध्यक्ष उस्मान शेठ तांबोळी तसेच माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी होळकर वंशाचे श्रीमंत राजे होळकर, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, माजी उपसभापती अतुल पाटील, सविता राजे भोसले, देवानंद बागल, सुभाष गुळवे, राजाभाऊ कदम धुळा भाऊ कोकरे डॉक्टर वसंत पुंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेड, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, करमाळा तालुका मुस्लिम संघटना आदींनी माढा लोकसभेचे उमेदवार मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा दिला.

यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली यामध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील प्रलंबित विविध विकास कामाकडे आपले लक्ष वेधले तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामाकडे माननीय शरदचंद्रजी पवार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी माजी आमदार पाटील यांनी भाषणांमधून केली याशिवाय आमदार रोहित पवार माजी आमदार उत्तमराव जानकर एडवोकेट सविता शिंदे राजाभाऊ कदम यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक नितीन चोपडे यांनी केले तर आभार शिवराज जगताप यांनी मानले.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

शिंदे गटाला सोडचिट्टी तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश,,,,,

करमाळा तालुक्याचे माजी आमदार तसेच एकेकाळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी शिंदे गटाला सोडचिट्टी देऊन अखेर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला पवार गटात माजी आमदार पाटील यांनी प्रवेश केल्याने पवार गटाची ताकद करमाळा तालुक्यात वाढली आहे

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार तसेच उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या भेटीला

देशाचे माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या उभयतांनी कार्यक्रम अगोदर माजी आमदार जयंतराव जगताप यांची भेट घेतली या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे

या भेटीनंतर शरदचंद्रजी पवार यांनी जिल्ह्याचे नेते कैलासवासी नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले यावेळी माजी आमदार जयंतराव जगताप यांनी शरदचंद्रजी पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार केला.

litsbros