करमाळामाढासोलापूर जिल्हा

*वातावरणातील बदलामुळे उकाड्यात झाली वाढ*

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*वातावरणातील बदलामुळे उकाड्यात झाली वाढ*

केत्तूर ( अभय माने) गेल्या दोन-चार दिवसापासून सायंकाळी आकाशामध्ये ढगाळ वातावरण तयार होत असल्याने, दिवसभर ही उकाडा अन् रात्रीही उकाडा असे चित्र केत्तूर (ता. करमाळा) परिसरात पहावयास मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे रात्रीच्या उकाड्यातही प्रचंड वाढ झाल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.त्यातच विजेचा लपंडावही त्यामध्ये भर घालण्याचे काम करत आहे.

गेल्या दोन दिवसापासून सायंकाळच्या वेळी आकाशात ढग तयार होत असल्याने उकाडा अधिकच तीव्र जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी सूर्यनारायण आग ओकत असल्याने रहदारी पूर्णपणे मंदावली आहे तर दुपारी शेतमजूर कामाऐवजी झाडाखाली विश्रांती घेणे पसंत करीत आहेत.उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने उभ्या पिकांची वाढ थांबली आहे.उजनी जलाशयाचे पाणी खाली खाली सरकत असल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.मोटरी,पाईप, केबल वाढवावे लागत असल्याने ऐन उन्हात शेतकरी राजा कसरत करताना दिसत आहे.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

कुंभेजची लेक श्वेता शिंदे हिस ‘बी टेक’ पदवी प्रदान

शेतकऱ्यांना मिळणारी वीज आठ तासावरून वीज सहा तास केल्याने संकटात आणखी भर पडली आहे. जनावरेही झाडाच्या सावलीत विश्रांती घेत आहेत.वाढत्या उन्हाचा जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे.उन्हामुळे ताप आणि डोकेदुखीचे रुग्ण दवाखान्यात वाढू लागले आहेत. दुपारी बारा ते चार या वेळेत विक्रमी उष्णता असल्याने यावेळी गरज असेल तरच बाहेर पडावे असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

litsbros