३७ वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
करमाळा (प्रतिनिधी)
जुने मित्र मैत्रीण त्यांच्यासोबत शिकत असताना घडलेले गमतीशीर किस्से शिक्षण घेत असताना काढलेल्या खोड्या अशा साऱ्या आठवणींना उजाळा देत आठवणीत रमले विद्यार्थी औचित्य होते करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे या सोहळ्यासाठी दहावीतील १९८६ बॅचचे तब्बल एकूण ७० विद्यार्थी उपस्थित होते.
सोलापूर, नगर, पुणे, मुंबई, लातूर, सातारा अशा अनेक जिल्ह्यातून आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते करमाळा शहरातील बायपास जवळील राजयोग हॉटेलमध्ये सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये जुन्या मित्र मैत्रिणींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना हसवले.
उपस्थित सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जुन्या आठवणींना ताजे करीत महात्मा गांधी विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा वर्ग देखील भरला होता यावेळी माजी शिक्षक गोरे सर, आर व्ही शिंदे सर, यांनी विद्यार्थ्यांना काही जुन्या आठवणी सांगत आपले मनोगत व्यक्त केले तर आर आर मोरे यांनीही आम्ही विद्यार्थ्यांना कसे घडवले याबाबत मनोगत व्यक्त केले तर नंदकुमार शेंडगे यांनी आपल्या कविता सादर केल्या सूत्रसंचालन फोजमल पाखरे व भाऊसाहेब फुलारी यांनी केले या कार्य क्रमासाठी या महात्मा गांधी विद्यालयातील माजी शिक्षक नंदकुमार शेंडगे, सस्ते सर, विधाते सर, आर व्ही शिंदे सर, एस पी शिंदे सर, तात्यासाहेब मस्कर सर गोरे सर, आर आर मोरे सर, जांभळे सर, मांडवकर सर, आदि शिक्षकांचा यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कमला भवानी देवीचे तैल चित्र अर्थात फोटो शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
याच वेळी साम टीव्ही फेम सोहेल मुलाणी यांनी जरांगे पाटील यांच्यावर लिहिलेले गायलेले व संगीतबद्ध केलेले गीत गायले तसेच गझल याशिवाय मोहम्मद रफी यांच्या जुन्या गाण्यांची आठवण करीत माजी विद्यार्थ्यांची चांगलीच करमणूक केली यावेळी मुलाणी यांचा देखील सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.
तब्बल ३७ वर्षांनी एकत्र येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा एकंदरीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने तसेच माजी शिक्षकांचा सन्मान करीत मोठ्या उत्साहामय व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला यावेळी सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिध्देश्वर मस्कर तसेच माजी विद्यार्थी नियोजन कमिटीने विशेष परिश्रम घेतले.
Comment here