मनोरंजनमहाराष्ट्र

लोकसभा आचारसंहितेमुळे जत्रा यात्रातील मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ब्रेक, कलावंतांचे काय ?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लोकसभा आचारसंहितेमुळे जत्रा यात्रातील मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ब्रेक, कलावंतांचे काय ?

केत्तूर ( अभय माने) गुढीपाडवा झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या यात्रांचा जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे.यात्रेनिमित्त मनोरंजन म्हणून लोकनाट्य तमाशा, आर्केस्ट्रा या कार्यक्रमाबरोबरच कुस्तीचे जंगी मैदानही आयोजित करण्यात येते.

यात्रेसाठी मुंबई, पुणे व इतर शहरी भागात व्यवसायासाठी व नोकरीसाठी गेलेली मंडळी आवर्जून गावाकडे हजेरी लावतात. काही शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे तर काही शाळा अद्यापही सुरू आहेत असे असले तरीही यात्रा जत्रांचा हंगाम मात्र दणक्यात सुरू आहे.

यात्रांच्या पार्श्वभूमीवर गावागावात वर्दळ, लगबग दिसून येत आहे. खेळण्याची दुकाने, मेवा मिठाईची दुकाने, पाळणे यामुळे जत्रा यात्रांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

वर्षातून एकदा येणाऱ्या ग्रामदैवाजांच्या यात्रा जत्रांच्या हंगामावर यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काही बंधने येण्याची शक्यता असल्याने या कार्यक्रमावर विरजण पडणार आहे.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

शेलगाव(क)च्या लेकीची कृषिसेवक पदी नियुक्ती; राज्यात चौथा क्रमांक, सर्वत्र कौतुक

आदर्श आचारसंहिते बाबत यात्रा कमिटी व पदाधिकारी यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.आचारसंहितेमुळे जत्रा यात्रा मध्ये होणारे मनोरंजनरंजनात्मक कार्यक्रम तमाशा, आर्केस्ट्रा यांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे कारण हे कार्यक्रम रात्री दहा वाजण्याच्या पुढे सुरू होत असतात.

litsbros