वाशिंबे:पादचारी रेल्वे भूयारी मार्गाच्या कामाला अखेर सुरवात
अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त
केत्तूर ( अभय माने) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वाशिंबे येथील पाण्याची टाकी परिसरात रेल्वेखालून पादचारी भूयारी मार्ग करण्याच्या कामास शुक्रवार दि.31 रोजी सुरवात झाली.रेल्वे लाईन मुळे गावाचे दोन भाग झाले होते.राजुरी रस्ता,जूना पारेवाडी रस्ता व लगतच्या शिवारास गावात येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे नागरीक, विद्यार्थी,अबालवृद्धांना ओढ्यातुन तसेच रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.त्यामुळे कि.मी.क्र.322 या ठिकाणी भूयारी मार्ग व्हावा अशी मागणी होती.रेल्वे प्रशासनाने दखल घेत पादचारी भूयारी मार्गास मंजुरी देऊन जुलै महीन्यात निविदा प्रसिद्ध केली होती.
गुलमोहरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील छोट्या चिमुकल्यांचा मोठा कलाविष्कार
सद्या सुरु असलेला भूयारी मार्गामध्ये दोन्ही बाजूंना जोडणारा सिंमेट काँक्रीट रस्ता,पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी ड्रेनेज तसेच तट भिंती सिमेंट काँक्रेट मध्ये बांधण्यात येणार आहेत.या भूयारी मार्गाच्या माध्यमातून रेल्वे लाईनच्या वरील भाग गावाशी जोडला जाणार आहे.या कामास सुरुवात झाल्यामुळे ओढ्यातून व पाणंद रस्त्यावरुन चाललेला प्रवास थांबणारआहे.
अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून आनंद व्यक्त केला जात आहे.