जागतिक पाणथळ दिनानिमित्त यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन अभ्यासगटाचे ताडोबात पक्षीनिरीक्षण.
चंद्रपूरातील पाणथळ परीसरात पक्ष्यांसह वन्य जिवांचीही नोंदविली निरीक्षणे.
केत्तूर (अभय माने) जागतिक पाणथळ दिवस 2025 ची संकल्पना आहे. भविष्यासाठी पाणथळ संवर्धन.
यशकल्याणी संस्थेच्या सहकार्याने संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या पक्षीनिरीक्षण व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पाणथळ अधिवासांचे महत्व, त्यांची उपयोगिता याबाबत व्यापक स्तरावर जाणिव जागृती होऊन पाणथळींचे संवर्धन होण्यासाठी दरवर्षी जगभरात विविध उपक्रम राबवले जातात.
2 फेब्रुवारी रोजी साजरा होत असलेल्या या उपक्रमाचे औचित्य साधत यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनच्या अभ्यासगटाने चंद्रपुरातील ताडोबा परिसरातील ईराई तलाव परिसरात पॅच बर्डींग नुसार पक्षीनिरीक्षण केले.
यावेळी शॉवलर डक, ओपन बिलस्टॉर्क, रिव्हर टर्न, स्टिल्ट, ग्रे हेरॉन, कॉमन कूट, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, ऑस्प्रे, ट्रीपाय, हनी बझार्ड, जंगल बॅबलर, रेड स्टार्ट, अदिसह 15 प्रकारच्या 67 पक्ष्यांची व पाणथळी व ग्रास लँड वर अवलंबून असणारे, स्पॉटेड डियर, अँटेलोप, बार्कींग डियर, जंगल बीअर, पट्टेरी वाघ आदि वन्यजीवांचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
अभ्यास गट सहभागी
प्रा. गणेरा करे-पाटील, प्रा.बाळकृष्ण लावंड, प्रा जयेश पवार, प्रा.विष्णू शिंदे, अतुल दाभाडे बर्डमॅन ऑफ ताडोबाचे सुमेथ वाघमारे यांचेसह पक्षीनिरीक्षक कल्याणराव साळुंके हे या अभ्यासगटात सहभागी होते.
हेही वाचा – परांडा येथे झालेल्या एसटी अपघातात पारेवाडी येथील तात्या पाटणे यांचा मृत्यू
श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उज्वल यश
” निसर्ग संतुलनात मतत्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्ष्यांचे व वन्यजीवांचे अधिवास जपले जावेत. त्यासाठी व्यापक जाणिव जागृती करुन निसर्गाप्रति संवेदनशीलता वाढावी यासाठी यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनद्वारे विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे.”
– प्रा. गणेश करे- पाटील
अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था.