करमाळामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

उन्हाळी वाळवणीचे पदार्थ तयार करण्यासाठी महिला मंडळीची लगबग

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उन्हाळी वाळवणीचे पदार्थ तयार करण्यासाठी महिला मंडळीची लगबग

केत्तूर (अभय माने) यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागली होती सध्या उष्णतेचा पारा 40°अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे गेल्या चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे त्यामध्ये कमी जास्त पणा मात्र होत आहे.

ग्रामीण भागात महिला गृहिणींचा कुरडया भातवड्या सांडगे पापड वेफर्स आधी उन्हाळी पदार्थ बनवण्याची लगबग चालू असल्याचे दिसून येत आहे अंगणात तसेच घराच्या छतावर हे पदार्थ सध्या करण्यात येत आहेत.

यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता जास्त प्रमाणात आहे पारंपारिक पद्धतीने गृहिणींची दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी उन्हाळी कामाची गडबड सुरू झाली आहे गव्हाचा चीक तयार करून त्यापासून वर्षभर पुरतील अशा कुरडया बनवल्या जातात .

तर ज्वारीच्या पापड्या, तांदळाच्या पापड्यापापड्या, हरभरा डाळीचे सांडगे, बटाट्याची वेफर्स, चिवडा तसेच बटाटा कीस,तिखट पापड्या,शेवाया असे विविध पदार्थ तयार करून ते उन्हात ठेवतात कडक ऊन लागले की हे पदार्थ कित्येक महिने चांगले राहतात व वर्षभर उपयोगी पडतात रेडिमेट पदार्थ घेण्याऐवजी महिला स्वतःच वाळवण्याचे पदार्थ बनविण्यास प्राधान्य देत आहेत .

उन्हाळा ऋतू जरी त्रासदायक असला तरी,भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये त्याची मोठी मदत होत आहे.

या काळात खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ मोठ्या प्रमाणात महिला मंडळी बनवितात किंवा तयार केले जातात.कुरडयासारखे काही पदार्थ तयार करण्यासाठी जवळपास चार ते पाच महिला एकत्र येऊन हे काम करतात घरातील महिला व शेजारच्या महिला मंडळी मिळून हे काम केले जाते .

हेही वाचा – उजनी बॅकवॉटर मानवनिर्मित प्रदूषणामुळे जलचर परिसंस्था धोक्यात; पक्ष्यांच्या प्रजाती वर परिणाम; स्थलांतरित पक्षी बाधित

चांगली बातमी; अखेर करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला भुलतज्ञ मिळाले; रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रियेसाठी सक्षम व्यवस्था; रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. स्मिता बंडगर

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये या उन्हाळी पदार्थांना खास व महत्त्वाचे स्थान आहे घरात लग्नकार्य असली की, सुरुवात या उन्हाळी पदार्थापासूनच केली जाते.

त्यातही सांडग्यापासून सुरुवात होते लग्नाच्या रुकवतामध्ये सर्रासपणे रंगीबेरंगी कुरडया,भातवड्या, पापड्या, पापड आदि पदार्थ आकर्षकपणे मांडले जातात.

litsbros

Comment here