आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे राज्यात दरवर्षी 70 हजार महिला मृत्यूमुखी पडतात; उपाययोजना करणे काळाची गरज, डॉ.श्रद्धा जवंजाळ यांचे प्रतिपादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे राज्यात दरवर्षी 70 हजार महिला मृत्यूमुखी पडतात; उपाययोजना करणे काळाची गरज, डॉ.श्रद्धा जवंजाळ यांचे प्रतिपादन

करमाळा(प्रतिनिधी); गर्भाशयाचा कॅन्सर हा मोठा आजार सध्या महिलांमध्ये दिसून येत असून याला प्रति प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असून ही लस घेतली तर 99 टक्के महिला या आजारापासून दूर राहू शकते त्यासाठी या लसीकरणाची गरज आहे असे मत गर्भाशयाच्या कॅन्सरवर संपूर्ण देशात जनजागृती करणारे डॉक्टर श्रद्धा जवजाळ यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गर्भाशयाच्या कॅन्सरवर प्रतिबंध करणाऱ्या लस इच्छुक असणाऱ्या महिलांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला

270 महिलांनी यात नोंदणी करून या महिलांना पुढील महिन्यात लस देण्यात येणार आहे

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी प्रमुख मंगेश चिवटे डॉक्टर कविता कांबळे शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड
आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉक्टर श्रद्धा म्हणाले की राज्यात दरवर्षी 70 हजार महिला गर्भाशयाचे कॅन्सर मुळे मृत्यूमुखी पडतात
प्रतिबंध करणारी लस आहे
विशेषतः सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्त्रियांनी तरुणींनी ही लस घेणे गरजेचे आहे

प्रतिबंधक लसची किंमत चार हजार रुपये आहे लस या शिबिरात मोफत देण्यात येत आहे
करमाळा शहरातील तालुक्यातील महिलांनी या संदर्भात सजग राहून महिलांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त महिलांची लस घेण्यासाठी नोंदणी करावी.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनेक उपक्रम घेऊन आरोग्याच्या संदर्भात दक्ष आहेत
बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे मोफत कॅन्सर वरचे उपचार केले जातात
फक्त लोकांना माहिती नसल्यामुळे सेवा मिळत नाही यामुळे सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत
विशेषता कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनी ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा – हिंगणी येथील विविध कार्यकारी सेवा संघाच्या निवडणुकीत जगताप शिंदे गटांची बाजी; पाटील गटाचा पराभव

करमाळ्यातील पोथरे गावात अनोखा उपक्रम! 300 आई- वडीलांची रथात बसवून काढली मिरवणूक

करमाळ्यातील अकरावीतील मुलगी अमृता लावंड तिने जवळपास 62 महिलांना प्रबोधन करून ही लस घेण्यास प्रवृत्त केले व त्यांची नाव नोंदणी केली या तिच्या उपक्रमाबद्दल बद्दल डॉक्टर
श्रद्धा जवंजाळळ यांनी त्यांचा सत्कार जेऊर.

litsbros

Comment here