करमाळासोलापूर जिल्हा

उजनी बॅकवॉटर मानवनिर्मित प्रदूषणामुळे जलचर परिसंस्था धोक्यात; पक्ष्यांच्या प्रजाती वर परिणाम; स्थलांतरित पक्षी बाधित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी बॅकवॉटर मानवनिर्मित प्रदूषणामुळे जलचर परिसंस्था धोक्यात; पक्ष्यांच्या प्रजाती वर परिणाम; स्थलांतरित पक्षी बाधित

केत्तूर(अभय माने); सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या ‘बॅकवॉटर’ मानव निर्मित प्रदूषणामुळे जलाशयातील जलचरीय परिसंस्था धोक्यात आले आहे.जलाशयाचा पाणीसाठा ही सध्या 15 टक्केवर आला आहे.

     पुणे शहर व जिल्ह्यातील नदीकाठच्या शहर- गावांच्या परिसरात वापरलेले सांडपाणी व औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते व नंतर आपोआप उजनी जलाशयामध्ये मिसळले जाते.या कारणामुळे जलाशयातील पाणी दूषित झाले आहे.सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्यासाठी पाण्याचे उपसा केले जाते. प्रदूषित पाण्यामुळे नानाविध जलचर व पक्ष्यांची अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

 

स्थलांतरित पक्षी संकटात —-

भीमा नदीच्या अथांग पात्रात विविध जातींच्या पक्षी वर्षभर आपले उदरनिर्वाह चालवत असतात. हिवाळ्यात बहुसंख्येने परदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पाहुणे पक्ष्यांची धरण परिसरात रेलचेल असते. मात्र पाणीप्रदूषणामुळे तुलनेने या वर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलले विविध प्रजातींचे मासे, खेकडे, जलकीटक, मृदुकाय प्राणी,शेवाळे इत्यादी घटकांवर प्रदूषित पाण्याचा परिणाम होऊन त्यांची वाढ खुंटल्याने पक्ष्यांना पुरेशा खाद्य उपलब्ध होईना झाले आहे. 

नदीवरील मासेमारी धोक्यात

उजनी पाणलोट क्षेत्रात व भीमा नदीच्या पात्रात मासेमारीचा मोठा व्यवसाय चालतो.प्रदूषित पाण्यामुळेमासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागते आहे. पाणलोट क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी साठलेल्या पाण्यावर दुर्गंधीयुक्त हिरवट आल्याने मत्य व्यवसायांचे आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. पाण्याच्मा स्पर्शाने शरीराला खाज सुटणे व त्वचेचे विकार आदी बाधक परिणाम दिसून येतात. 

    ” मानव निर्मित प्रदूषणामुळे उजनी जलाशयातील पाणी विषारी बनले आहे. हे पाणी पिण्यास पाळीव प्राण्यासह मानवी समाजाला हानिकारक आहे. रसायनयुक्त पाण्यात माशांसह इतर जलचरांना आवश्यक असलेले सूक्ष्म अन्न प्लवंग (प्लॅंक्टाॅन)ची वाढ होत नाही. प्रदूषित पाण्यात प्राणवायू सह इतर पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे मासे कुपोषित होतात.‌धरणात मिसळणाऱ्या पाण्यावर वैज्ञानिक पद्धतीचे प्रक्रिया करणे आवश्यक आहे व जलाशयातील पाण्याची योग्य निगा राखणे आवश्यक आहे ‌ 

    – डॉ.अरविंद कुंभार,पर्यावरण अभ्यासक.

litsbros

Comment here