करमाळासोलापूर जिल्हा

सालसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सालसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

करमाळा प्रतिनिधी :  दि.२३ एप्रिल रोजी सालसे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली.

यावेळी रिपाई चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेशदादा कांबळे हे उपस्थित होते.त्यांनी तरुणांनी एकत्र येऊन सत्कार्य करावे व बाबासाहेबांचे विचार पुढे न्यावेत असे भाषणात सांगितले.तर दिपक ओहोळ सर यांनी बाबासाहेबांचे देशासाठी असलेले मोलाचे कार्य व संविधान निर्मितीतील योगदान सांगितले.

सालसे येथील सिद्धार्थ तरुण मंडळाचे वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.२२ रोजी जल्लोष भीम-बुद्ध गीतांचा हा कार्यक्रम घेण्यात आला. दि.२३ रोजी जंगी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे इ. महापुरुषांचा जयघोष करण्यात आला.हजारोंच्या संख्येने अनुयायी,महिला उपस्थित होत्या.

यावेळी रिपाइचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेशदादा कांबळे,वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ, वंचितचे जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड,उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते सुनिलजी कदम,अभिनव भारत या संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार संतोष राऊत, माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ,

हेही वाचा – गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे राज्यात दरवर्षी 70 हजार महिला मृत्यूमुखी पडतात; उपाययोजना करणे काळाची गरज, डॉ.श्रद्धा जवंजाळ यांचे प्रतिपादन

करमाळा शहरासाठी 6 कोटी वीस लाखाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर; वाचा सविस्तर

दलित सेनेचे लक्ष्मण भोसले,सरपंच सतिश ओहोळ, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य मधुकर हांडे, सतिश रुपनर,जालिंदर शिंदे,सालगुडे भाऊसाहेब,माजी सरपंच बिटाबाई मेहेर,भास्कर अंबारे सर,दादासाहेब मेहेर सर,संभाजी गोसावी सर,हरी माने सर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सिद्धार्थ तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले.शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

litsbros

Comment here