वेताळ साहेबांच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात फिसरे गावची वेताळ साहेब यात्रा उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी : फिसरे गावचे ग्रामदैवत वेताळ साहेब यात्रेनिमित्त छबिना व वेताळ साहेबांच्या घोड्याची मिरवणूक मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडली यावेळी वेताळ साहेबांच्या नावानं चांगभलं घोषणा देत नागरिकांनी उस्फूर्तपणे मिरवणुकीत उत्सवा सहभाग घेतला होता वेताळ साहेब मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
फटाक्याची आतिश बाजी व गुलालाचे मुक्त उधळण करण्यात आले सुमारे सहा तासाच्या मिरवणूक नंतर पुन्हा वेताळ साहेब मंदिरापाशी मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी तरुणांचा उत्सव मोठा होता
संपूर्ण यात्रा व छबिना मिरवणूक कोणतेही गालबोट न लागता शांतते संपन्न झाली यावेळी यात्रा उत्सव कमिटीने परिश्रम घेतले.
संध्याकाळी पाच वाजल्यापासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हे वेळी भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली तसेच संध्याकाळी आठ ते साडे अकरा या वेळेत आर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला सहा ते नऊ या वेळेत महाप्रसाद वाटप करण्यात आले.
Comment here