करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा शहरासाठी 6 कोटी वीस लाखाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरासाठी 6 कोटी वीस लाखाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर; वाचा सविस्तर

केत्तूर (अभय माने) करमाळा शहरात धर्मवीर आनंद दिघे अभ्यासिका सह संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह आठ कामासाठी सहा कोटी वीस लाख रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देऊन इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले आहेत.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करमाळा शहरातील विकासासाठी प्रस्ताव सादर केला.

यामध्ये करमाळा शहराच्या जेऊर दिशेने येणाऱ्या रस्त्यावर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वागत कमान उभा करणे तीस लाख रुपये,सिद्धार्थनगर स्वागत कमान उभा करणे तीस लाख रुपये,स्पर्धा परीक्षा साठी अभ्यास करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे अभ्यासिका उभा करणे एक कोटी रुपये,


करमाळा शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणं पन्नास लाख रुपयेरंभापुरा येथे संभाजी चौक सुशोभीकरण तीस लाख रुपये फंड गल्ली येथे व्यायाम शाळा तीस लाख रुपये
एसटी स्टँड ते मौलाली माळ बाजूने पादचारी मार्ग व सुशोभीकरण 50 लाख रुपयेछत्रपती शिवाजी महाराज पुतळा बायपास चौक दरम्यान स्ट्रीट लाईट बसवणे वीस लाख रुपये

हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माजी आमदार नारायण आबा यांनी केली ‘ही’ मागणी; वाचा केत्तूर

उजनी बॅकवॉटर मानवनिर्मित प्रदूषणामुळे जलचर परिसंस्था धोक्यात; पक्ष्यांच्या प्रजाती वर परिणाम; स्थलांतरित पक्षी बाधित

प्रमुख कामासह सहा कोटी वीस लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याची अंदाजपत्रक तयार करण्याचे सूचना करमाळा नगरपालिकेला देण्यात आले आहेतयापूर्वीच शहरासाठी दोन कोटी दहा लाख रुपयांचा निधी केला असून या कामाची लवकर सुरुवात होणार आहे

litsbros

Comment here