Uncategorized

जीवघेण्या थंडीने गारठून 16 जनावरांचा मृत्यू; सैरभर शेतकऱ्याचा रानातच टाहो!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जीवघेण्या थंडीने गारठून 16 जनावरांचा मृत्यू; सैरभर शेतकऱ्याचा रानातच टाहो!

एकीकडे भीषण पाऊस. खरिपाचे केलेले अतोनात नुकसान. त्यामुळे संसाराची विस्कटलेली घडी. ती घडी सावरतेय न सावरतेय तोच ऐन रब्बीतही अवकाळी पावसाचे थैमान. त्यामुळे एकीकडे द्राक्ष, कांदा, आंबा, स्ट्रॉबेरी, भाजीपाला साऱ्या पिकांवर संक्रांत आलीय. तर दुसरीकडे जीवघेण्या थंडीने गारठून मुकी जनावरे प्राण सोडत आहेत. जिल्ह्यात देवळा तालुक्यात अशा तब्बल 16 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सैरभर झालेल्या शेतकऱ्याने रानातच टाहो फोडला.


नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाची हजेरी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काल दिवसभर आणि रात्रीही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पाऊस काही जास्त पडला नाही. मात्र, त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच पावसात सुटलेले वारे. यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. अक्षरशः घराबाहेर पडणे नकोसे झाले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील रस्ते ओस पडले आहेत. अशा थंडीतच देवळा तालुक्यात लहान मोठी अशी एकूण 16 जनावरे दगावली आहेत.

दहिवड शिंदेवाडी – भवरी मळा येथे ही घटना घडली. चक्क मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांनी हाय खाल्ली आहे. या प्रकरणी प्रशासनाने त्वरीत पंचनामा करून नुकसानग्रस्त मेंढपाळाला मदतीची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ओमीक्रॉनचा भारतात शिरकाव, दोन बाधित सापडले


दरम्यान, पाऊस असेपर्यंत थंडी राहणार आहे. शिवाय या दोन दिवसांत बोचरी थंडी वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा आठवडा मुक्या जीवांसाठी जास्तच धोकदायक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

litsbros

Comment here