करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

केत्तूर (अभय माने) उजनी धरणातील पाणीसाठा अतिशय कमी झाल्यामुळे उभी पिके वाचवण्यासाठी धरणकाठच्या शेतकरी पाण्यातील गाळात उतरून पिके वाचवण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. मात्र सध्या उजनी जलाशयात पाणी कमी आणि गाळ अधिक असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी आवश्यक साधने घेऊच पाण्यातच उतरावे. अन्यथा गाळात रुतून जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी व मच्छिमारांनी पाण्यात उतरण्यापूर्वी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

उजनी जलाशयाचा पाणीसाठा नीचंकी पातळीवर गेला आहे. यामुळे उजनी जलाशयात पाणी कमी आणि गाळाचे प्रमाण जास्त प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे अनेकदा नदीकाठावरील हिरवळ ,गवत खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी अनेक पाळीव जनावरे नदीकाठावर किंवा पाण्यात जाऊन या गाळात रुतून बसल्याचा घटना घडत आहेत अशीच घटना पोमलवाडी (ता. करमाळा) येथील शेतकरी सूर्यकांत पिसाळ यांची एक गाभण जरशी गाय जलाशयात जुन्या रेल्वेच्या पाच पुलाजवळ चरत असताना पाणी पिण्यासाठी जात असताना गाळात फसतच ( अडकत ) गेली.

ती गाळा खाली जात असताना शेतकरी राजेंद्र काळे यांनी पाहिले व जलाशयात मच्छीमारी करणाऱ्या खतः राजेंद्र काळे, सोमनाथ कनिचे, नारायण पतुले, सचिन कनिचे या युवकांनी होडीतील दोरी घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली व गाळात उतरून या गाईला दोरी बांधली व दोरीच्या साह्याने गाईला दीड दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

हेही वाचा – उन्हाळी सुट्ट्या.. एस् टी बसेसला गर्दीच गर्दी; अनेक बसेस नादुरुस्त.. करमाळा समस्यांचे आगार!

आपली मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घ्यावी : समाजप्रबोधनकार प्रबोधनकार ॲड . डॉ.बाबुराव हिरडे

शेतकऱ्यांनी नदीकाठावर गुरे चारताना किंवा पाण्यात उतरताना मच्छिमारांनी व शेतकऱ्यांनी कंबरेला दोर बांधून तसेच सोबत एखादा जोडीदार बरोबर असेल तरच पाण्यात उतरावे अन्यथा उतरू नये असे आवाहन येथील जाणकार मंडळींकडून करण्यात येत आहे.

गाळाचा अंदाज येत नसल्याने तसेच तळ लागत नसल्याने जनावरे तसेच शेतकरी बांधव गाळात खोलवर जाऊन गडप होण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.

litsbros