करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

पिक कर्ज पुनर्गठनाचे आदेश बँकांना द्यावेत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पिक कर्ज पुनर्गठनाचे आदेश बँकांना द्यावेत

केत्तूर ( अभय माने ) खरीप हंगामा आता काही दिवसावर येऊन ठेपला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होण्यासाठी जिल्हा बँकेला पीक कर्ज पुनर्गठन करण्याबाबत आदेश देण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अजित विघ्ने यांनी केली आहे.

गतवर्षी कमी पर्जन्यमानामुळे पेरणी होऊनही अल्प उत्पादन निघाले जे पिक आले त्याला योग्य दर मिळाला नाही यातच सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका केळी आंबा व इतर फळबागांना बसला आहे.निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता त्याप्रमाणे ऐन निवडणुकात दुष्काळ निधी अनुदान काही शेतकऱ्यांना मिळाले तर काही शेतकरी या अनुदानापासून अद्यापही वंचित आहेत.

हेही वाचा – तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

दहाच्या चलनी नोटांची व्यवहारात टचाई: आहेत त्या नोटा जीर्ण व फाटक्या

शेतकऱ्यांच्या पैसे आता संपले आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी पैसे उपलब्ध होण्यासाठी जिल्हा बँकेने कर्ज पुनर्गठन करण्याबाबत त्वरित आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विघ्ने यांनी केली आहे.

litsbros