माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे एसएससी परीक्षेत घवघवीत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे एसएससी परीक्षेत घवघवीत यश

माढा प्रतिनिधी –माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक चा एसएससी मार्च 2024 चा निकाल 97.08 % लागला असून अनुष्का विकास गुंड या विद्यार्थिनींने 92.40 % गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला.तर अनुष्का रमेश गिराम हीने 91.80 % गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.तसेच रोहन धनाजी व्हरगळ याने 91.20 % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

रयत शिक्षण संस्थेचे श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक या विद्यालयातील एसएससी या परीक्षेत 103 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचे 06 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले तर 65 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह,26 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 07 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 02 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

हेही वाचा – तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

विद्यालयातील इयत्ता दहावी (एस.एस.सी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य तसेच स्कूल कमिटी सदस्य ॲड.मा.श्री बाळासाहेब पाटील साहेब,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा.श्री सिताराम (बापू) गायकवाड, मा.श्री भारत (आप्पा) घाडगे,ॲड.मा.श्री नानासाहेब शेंडे (वकिलसाहेब),विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री दशरथ देशमुख साहेब,लेखनिक मा.श्री मुकुंद गायकवाड सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,माजी विद्यार्थी संघ,सर्व सेवक व विद्यार्थी तसेच उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

litsbros