मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सर्पदंश उपचारासाठी मदत करण्याची मागणी; बळीराजा शेतकरी संघटना करमाळा यांनी दिले मुख्यमंत्र्यांना पत्र
करमाळा (प्रतिनिधी); मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळत नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत यामुळे सर्पदंशासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षातून मदत मिळावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णा सुपणवर यांनी केली आहे.
सध्या शेतीची कामे जोरात असून ही कामे करत असताना शेतकऱ्यांना सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयात तात्काळ रुग्णालय ऍडमिट करावे लागते. यावेळी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात यामुळे व्याजाने टक्केवारी पैसे घेऊन उपचार करावे लागतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून सर्पदंश उपचारासाठी तात्काळ मदत मिळाली तर अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकतात.
शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर मोफत उपचार केले जातात. शासकीय रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसतात डॉक्टर उपलब्ध नसतात व अनेक शासकीय रुग्णालय ग्रामीण भागापासून 50 ते 100 किलोमीटर अंतरावर आहेत.
विषारी प्रजातीचा साप चावला तर तात्काळ भारी भारी महागडी इंजेक्शन द्यावी लागतात एक तासाच्या आत तात्काळ उपचार करणे गरजेचे असल्यामुळे तात्काळ उपचार करावे लागतात.
यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी संबंधित हॉस्पिटलच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी सुजित बागल यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सर्पदंश होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याला कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत शासन देते.
मात्र उपचार घेण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक मदत शासन देत नाही
ही गोष्ट विचार करण्यासारखी असून उपचारासाठी मदत देण्यात गरजेचे आहे असे मत शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.
Comment here