करमाळाराजकारण

पुरवणी अर्थसंकल्पात करमाळा मतदार संघातील रस्ते विकासासाठी ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद; आ. संजयमामा शिंदे यांनी दिली माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पुरवणी अर्थसंकल्पात करमाळा मतदार संघातील रस्ते विकासासाठी ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद; आ. संजयमामा शिंदे यांनी दिली माहिती

करमाळा (प्रतिनिधी); महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी ना.अजित दादा पवार यांची निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा करमाळा तालुक्याला मिळणाऱ्या निधीचा ओघ पूर्वीप्रमाणे सुरू झाला असून त्याची प्रचिती जुलै 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पा मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षीपासून मतदार संघातील ग्रामीण मार्गांना निधी मिळण्याची तरतूद प्रथमच अर्थसंकल्पात करण्यात आली असून करमाळा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांच्या विकासासाठी तब्बल 18 कोटी तर राज्यमार्गाच्या व प्रमुख जिल्हा मार्गाच्या विकासासाठी 7 कोटी अशी 25 कोटी निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. हा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब ,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानले.

करमाळा मतदार संघासाठी मंजूर झालेल्या निधीमधून कुगाव चिकलठाण नं 1 शेटफळ जेऊर कोंढेज साडे रस्ता ,कुंभारगाव ते घरतवाडी रस्ता, कुस्करवाडी ते इजिमा 78 रस्ता ,बोरगाव ते निलज रस्ता, रावगाव ते दगडवाडी ते शेळके वस्ती वाघमारे वस्ती ते वडगाव रस्ता , महादेव वाडी ते पणासे वस्ती रस्ता, मुंगशी ते नाडी रस्ता, भोसरी ते चिंकहिल रस्ता, म्हैसगाव ते पवार वस्ती रस्ता,

दहिवली ते पवार वस्ती रस्ता, निमगाव ते वरपे वस्ती रस्ता ,अंबड ते बिरोबा वस्ती रस्ता, कुर्डू ते घाटणे ते ढाणे वस्ती रस्ता, पिंपळ खुंटे ते वडाचीवाडी रस्ता, निमगाव ते काशीद वस्ती रस्ता, भुताष्टे ते सापडणे रस्ता, रामा 203 (वडाचीवाडी) ते सापटणे( भोसे) रस्ता, चिंचगाव ते लहू रस्ता,

चोभेपिंपरी ते गवळेवाडी बारलोणी रस्ता, पिंपळखुंटे ते कचरे वस्ती रस्ता, शेडशिंगे ते पिंपळनेर रस्ता, लऊळ ते सापडणे रस्ता, बारलोणी ते काशीद वस्ती रस्ता, रोपळे बिटरगाव शिंगेवाडी रस्ता, बिटरगाव ते नाडी रस्ता, कव्हे ते शिंगेवाडी रस्ता, कुर्डू ते दोघे पिंपरी रस्ता, कुर्डू ते घाटणे रस्ता ,रोपळे ते मुंगशी रस्ता या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

भविष्यात रिझल्ट दिसतील – आ.संजय शिंदे

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी व अर्थमंत्रीपदी ना.अजितदादा पवार यांची निवड झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे मतदार संघातील विविध विकास कामासाठी 100 कोटी निधीची मागणी केलेली होती.

त्यापैकी जुलै च्या पुरवणी अर्थसंकल्पा मध्ये 25 कोटी निधीला मंजुरी दिलेली असून उर्वरित कामे डिसेंबरच्या बजेटमध्ये मंजूर होतील.

त्याचप्रमाणे 2515 निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी येईल, त्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर असलेल्या कामावरील स्थगितीही उठेल .

जुलै 2022 ते जुलै 2023 या कार्यकाळामध्ये निधी मिळण्यास अडचणी आल्या, परंतु आता तो अनुशेष भरून काढण्याचे काम सुरू आहे. या विकास कामांचे रिझल्ट भविष्यात निश्चितच दिसतील.

litsbros

Comment here