करमाळा तालुक्यातील सरफडोह येथील सातबारा उताऱ्यावरील ती नोंद कमी करा; मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा सरफडोह येथील 1800 एकर क्षेत्रावर संस्थान नाव लागल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार बंद झाले असून कोणतेही विकास कामे करता येत नाही गेली पाच वर्षापासून या भागातील शेतकरी या प्रश्नासाठी लढा देत असून शेतकऱ्यांना कोणीही न्याय दिलेला नाही यामुळे आता या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पत्र व्यवहार केला होता
या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रश्नसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश करमाळा तहसील कार्यालयाला दिले आहेत
मात्र हा प्रश्न गंभीर झाला असून या भागातील शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची तिचे विकास कामे करणे कर्ज घरकुल योजना राबवणे वारसदारांची नावे लावणे ह्या प्रकार बंद झाले आहेत. या गावाचा विकास खुंटला आहे
आता या प्रश्नात तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयात बैठक घेऊन थेट शासन आदेश काढून या बंधनातून शेतकऱ्याला मुक्त करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी महादेव नलवडे रामभाऊ बोंद्रे छगन गवारे लक्ष्मण खराडे अण्णा देवकर अर्जुन रंधवे संजय भिताडे, गणेश घोगरे रामचंद्र कवडे प्रकाश रंधवे आधी शेतकरी उपस्थित होते.
लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रश्नासंदर्भात तसेच करमाळा तालुक्यातील रिटेवाडीसिंचन योजने संदर्भात असे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या शेतकऱ्यांना आश्वासन दिले
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे वेळेची मागणी केली आहे.
Comment here