करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा पंचायत समितीवर चक्क जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा; विद्यार्थ्यांवर का आली ही वेळ? शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर! वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा पंचायत समितीवर चक्क जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा; विद्यार्थ्यांवर का आली ही वेळ? शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर! वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील जेऊर परिसरातील वांगी नंबर एक येथे गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून सदर शाळेमध्ये त्वरित शिक्षकाची भरती करावी अशी मागणी आज चक्क जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांनी आज गटविकास अधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून व निवेदन देऊन आपला संताप व्यक्त केला आहे.

याबाबतची माहिती अशी की करमाळा तालुक्यातील वांगी नंबर एक येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे शाळा असून सदर शाळेवर गेली सहा महिन्यापासून पाच शिक्षक पदाची जागा रिक्त असून त्या रिक्त जागेवर अद्याप पर्यंत शिक्षकाची भरती गटशिक्षणाधिकारी यांनी केली नाही.

याबाबतचे निवेदन गेली सहा महिन्यापासून वांगी येथील ग्रामस्थ तसेच पालकांनी निवेदनाद्वारे वेळोवेळी मागणी केली होती मात्र आजतागायत केली सहा महिन्यापासून सदर रिक्त झालेल्या शिक्षक पदाची भरती अद्याप पर्यंत शिक्षण विभागाने केली नाही.

त्यामुळे नाईलाज असतो आज वांगी येथील शालेय विद्यार्थ्यांनी आज चक्क शिक्षक पदाची भरती करावी या प्रमुख मागणीसाठी गटविकास अधिकारी कार्यालय येथे बेधडक मोर्चा नेला होता.

विद्यार्थ्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला

सदर मोर्चातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भरती त्वरित करावी अशा मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन देण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांना झोळ फाउंडेशन च्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या बिस्कीटचे पुढे यावेळी देण्यात आल

गेली सहा महिन्यापासून वांगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकाची भरती होत नसल्याचे निषेधार्थ वांगी येथील विद्यार्थ्यांनी चक्क पंचायत समितीच्या आवारातच शाळा भरविली होती.

litsbros

Comment here