करमाळासोलापूर जिल्हा

मकाई व आदिनाथ कारखान्यांवर त्वरीत प्रशासक नियुक्त करा व निवडणूक प्रक्रिया पार पाडा; जगताप यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मकाई व आदिनाथ कारखान्यांवर त्वरीत प्रशासक नियुक्त करा व निवडणूक प्रक्रिया पार पाडा; जगताप यांची मागणी

करमाळा(प्रतिनिधी); निवडणुक नीधी व परिपूर्ण मतदार यादी सादर करण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याने मकाई व आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांवर त्वरीत प्रशासक नेमावा व निवडणुक प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सहकार मंत्री अतुल सावे यांचेकडे लेखी निवेदना व्दारे केली आहे . ३० डिसेंबर २०२१ रोजी मकाई व १९ मे २०२२ रोजी आदिनाथच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे .

राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डॉ पी एल खंडागळे यांनी १ मार्च २०२२ पासून ३० जून २०२२ च्या आत पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडण्या बाबत १५ फेबुवारी २०२३ रोजीच आदेश दिलेले आहेत.

तरी देखील मकाई व आदिनाथ साखर कारखान्याच्या सत्ताधार्‍यांकडून पराभवाच्या भितीने व आपण भ्रष्टाचार रूपी केलेले पितळ उघडे पडेल या भितीपोटी निवडणुक नीधी व परिपूर्ण मतदार यादी सादर करणेस जाणीवपुर्वक विलंब केला जात आहे .

नुकतेच राहुरी येथील डॉ . तनपुरे साखर कारखान्यावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कळवून देखील निवडणूक निधी जमा न केल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नियुक्त करणेत आले आहे .

हेही वाचा – कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी दिलीप तळेकर तर उपाध्यक्षपदी

सोलापूर-दौंड-सोलापूर या नवीन गाडीचे पारेवाडी येथे जंगी स्वागत; कुठल्या स्थानकावर किती वाजता असेल गाडी? वाचा क्लिक करून

त्याच धर्तीवर शासनाने तात्काळ मकाई व आदिनाथचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यांवर प्रशासक नियुक्त करावा व प्रशासकाच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी केली आहे.

litsbros

Comment here