कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी दिलीप तळेकर तर उपाध्यक्षपदी..
केम(प्रतिनिधी संजय जाधव); केम तालुका करमाळा येथील ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप संदिपान तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदी तर उपाध्यक्षपदी किरण जोशी यांचे बिनविरोध झाले आहे.
कुर्डूवाडी येथे जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणूकिसाठी सर्व संचालक मंडळाची मीटिंग बोलवण्यात आली होती सहाय्यक निबंध दिलीप तिजोरे, माढा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली चेअरमन पदासाठी दिलीप संदिपान तळेकर तर व्हॉईस चेअरमन पदासाठी किरण दोशी यांचे एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या. या वेळी जनता सहकारी बॅंकेचे संचालक फुलचंद धोका अरूण,गिडडे सुरेश शहा विक्रम बोराडे अर्जुन बागल विजयसिंह परबत अनिल कुमार पाटील मोनिका शहा सुलभा दिंडे अशोक खाडे अनिल कुमार तरटे चंद्रशेखर क्षीरसागर दिलीपचंद धोका संचालक उपस्थित होते.
या निवडीनंतर चेअरमन व व्हाइस, चेअरमन यांचा सत्कार कुर्डूवाडी जनता बँकेचे वतीने करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे सरपंच आकाश भोसले ग्रामपंचायत सदस्य व भावी सरपंच राहुल आबा कोरे, आपा ननावरे गुरूजी उपस्थित होते.
या निवडी बद्दल दिलीप तळेकर म्हणाले जनता बँकेच्या संचालकांनी माझ्यावर हा जो विश्वास टाकलाय त्याला तडा जाऊ न देता मी बँकेचा कारभार कारभार पारदर्शक करीन असे प्रतिपादन त्यानी केले या निवडीची बातमी केम येथे समजताच केम येथे जल्लोष साजरा करण्यात आला.
विधानपरिषद आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटिल यानी दिलीप दादा तळेकर यांचे अभिनंदन केले आहे.
Comment here