करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

निंभोरे सोसायटीवर माजी आमदार जगताप गटाचे वर्चस्व; क्लिक करून वाचा विजयी उमेदवार नावे..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निंभोरे सोसायटीवर माजी आमदार जगताप गटाचे वर्चस्व; क्लिक करून वाचा विजयी उमेदवार नावे..

करमाळा (प्रतिनिधी);
निभोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे .

जगताप गटाचे सोसायटीचे विद्यमान चेअरमन जोतीराम तात्या वळेकर व आ संजय मामा शिंदे समर्थक रविंद्र वळेकर यांच्या नेतृत्वा खालील श्री . खंडेश्वर शेतकरी ग्रामविकास पॅनेलने बागल समर्थक आदिनाथचे संचालक अविनाश वळेकर यांच्या नेत्तृत्वा खालील पॅनेलचा दारुण पराभव केला आहे .

विजयी उमेदवारांमधे जोतिराम वळेकर, रविंद्र वळेकर, नानासाहेब दळवे, मनिषा काकडे, भिमराव काळदाते, धनंजय सांगडे, अशोक वळेकर, पोपट वाघमारे ( सर्वसाधारण मतदारसंघ ) कविता वळेकर, मनिषा वाघमारे ( महिला प्रतिनिधी ) विक्रम मस्के ( अनुसूचित जाती जमाती ) किरण चांगण ( भटक्या विमुक्त जाती जमाती ) महादेव माळी ( इतर मागास वर्ग ) यांचा समावेश आहे.

हेही वाचा – सत्तरीच्या दशकातली पोमलवाडी अन केतुर “””””””””””””””””””””””””””” 🌹 ……..( चला पोमलवाडीला )………🌹

हलक्यांचा कडकडाट व टाळ, मृदुंग, पखवाज यांच्या गजरात रेल्वे थांबण्यासाठी पारेवाडी येथे भव्य मोर्चा

सर्व विजयी उमेदवारांचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अभिनंदन केले आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस . के . मुंढे यांनी काम पाहीले . मतदान व मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

litsbros

Comment here