करमाळासोलापूर जिल्हा

सोलापूर-दौंड-सोलापूर या नवीन गाडीचे पारेवाडी येथे जंगी स्वागत; कुठल्या स्थानकावर किती वाजता असेल गाडी? वाचा क्लिक करून

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर-दौंड-सोलापूर या नवीन गाडीचे पारेवाडी येथे जंगी स्वागत; कुठल्या स्थानकावर किती वाजता असेल गाडी? वाचा क्लिक करून

केत्तूर(अभय माने) सोलापूर रेल्वे कडून सोलापूर- दौंड- सोलापूर ही नवीन डेमो प्रवासीगाडी शुक्रवार (ता.17) पासून सुरू झाली असून, दुपारी तीनच्या दरम्यान पारेवाडी (ता.करमाळा) रेल्वे स्थानकावर या डेमो गाडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी या गाडीचे चालक तसेच गार्ड यांचा सत्कार केत्तूर प्रवासी संघटना तसेच ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला.सोलापूर – पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी पहिल्यांदाच नवीन रेल्वे प्रवासीगाडी सुरू झाल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

सदरची गाडी चालू झाल्याने पूर्वी सुरु असणारी पुणे-वाडी -पुणे या पार्सल रेल्वे प्रवासी गाडीची आठवण मात्र झाली .

गाडी क्रमांक 01461 सोलापूर ते दौंड डेमो गाडी ही (सकाळी) 10 वाजता सोलापूरहुन सुटणार आहे पुढे ती मोहोळ (सकाळी) 10:27,माढा (सकाळी) 10:57,कुर्डूवाडी (सकाळी)11:18,केम (सकाळी)11:35,जेऊर(सकाळी)11:50,पारेवाडी (दुपारी ) 12:15,भिगवन (दुपारी )12:35,दौंड (दुपारी) 3:35 वाजता पोहोचणार आहे तर
गाडी न.01462 दौंड ते सोलापूर डेमो

दौंड वरून (संध्याकाळी) 6:25 वाजता निघणार असून पुढे भिगवन 6:45 (संध्याकाळी), पारेवाडी7:05(संध्याकाळी), जेऊर 7:27(संध्याकाळी), केम 7:40 (संध्याकाळी), कुर्डूवाडी 7:58 (रात्री ),माढा 8:15(रात्री),मोहोळ 8:45(रात्री) व सोलापूर येथे
11:35 (रात्री)पोहोचणार आहे.

सदर गाडी सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दौंड येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने ब्लॉक घेण्यात आला होता त्यामुळे ही डेमोगाडी तब्बल तीन तास उशिराने धावत होती त्यामुळे ती पारेवाडी स्थानकावर दुपारी 12:05 ऐवजी दुपारी 3:15 वाजता आली.

छायाचित्र- पारेवाडी (ता.करमाळा) : रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते

litsbros

Comment here