करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खते व बियाण्यावर लक्ष ठेवण्याची गरज
केत्तूर ( अभय माने) खरीप हंगामात बोगस बियाणे तसेच खतांची चढ्या दराने खुलेआम विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कृषी खात्याने सतर्क राहण्याची गरज आहे.
अगोदरच दुष्काळी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे तर बागायती पट्टाही पाण्यासाठी कासावीस झाला आहे. त्यामुळे कृषी खात्याने बियाणे मोफत शेतकऱ्यांना वाटप करावे तसेच खतेही बांधावर उपलब्ध करून द्यावीत.
बोगस बियाणे व खते विकताना आढळल्यास 9 सप्टेंबर 1972 नुसार फक्त पाचशे रुपये दंड करण्याची तरतूद आहे. यामध्येही बदल करून दंडाची रक्कम वाढवावी व शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अजित विघ्ने यांनी केली आहे.