करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात हिवरे, हिसरे,कोळगाव,सौंदे, भागात वादळी वा-याचा धुमाकूळ; तीन जनावरांचा विज पडून मृत्यू , लाखो रुपयांचे नुकसान: केळी बागा भुईसपाट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात हिवरे, हिसरे,कोळगाव,सौंदे, भागात वादळी वा-याचा धुमाकूळ; तीन जनावरांचा विज पडून मृत्यू , लाखो रुपयांचे नुकसान: केळी बागा भुईसपाट

जेऊर (प्रतिनिधी अलीम शेख); करमाळा शहर तसेच तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या तुफानी वादळी वा-यासह झालेल्या पावसाने पश्चिम भागात मोठे नुकसान केले होते. या भागातील विजेच्या कडकडाटासह पाऊसाने धुमाकूळ घातल्यानंतर सोमवारी मंगळवारी व बुधवारी दुपारी व पुन्हा रात्रीच्या सुमारास तुफानी वादळ होऊन पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे .

यावेळी विजेच्या कडकडाटात अंगावर वीज पडून विविध ठिकाणी तीन जनावरे दगावली आहेत. तर एका ठिकाणी विजेच्या तारांमुळे व वादळामुळे घरात स्वयंपाक करतानाची चुलीतील आग घराला लागुन लाखो रुपयांचे जीवनावश्यक साहित्य जळून नुकसान झाले आहे.

याबाबतची हाकिकत अशी की काल सोमवारी रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारे व पावसाने करमाळा शहरासह पूर्व भागातील हिवरे, हिसरे, कोळगाव, सौंदे, आदि गावामध्ये वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला.

यावेळी अनेक घरावरील व शेडवरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी उन्हाळ्यानंतर जनावरांसाठी कडब्यांच्या गंजी उभा करण्यात आल्या होत्या. त्याही उडून गेल्या आहेत. या भागातील केळीच्या बागाही भुईसपाट झाल्याचे वृत्त आहे. विविध तीन ठिकाणी विज पडुन तीन जनावरे दगावल्याची नोंद करमाळा येथे झाली आहे.
यामध्ये देवळाली येथील इन्नुस शेख यांची एक दुभती म्हैस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मृत झाली. पश्चिम भागातील टाकळी येथे बाळकृष्ण गंगाधर गुळवे यांची 9 वाजता विज पडुन दुभती म्हैस ठार झाली तर गुळसडी येथील रघुनाथ ज्योतीराम माने यांची दुभती जर्सी गाई रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विज पडुन मृत झाली. यामध्ये सर्व जनावराचे मिळून चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तर भगतवाडी या ठिकाणीही पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

भगतवाडी येथे स्वयपाक घरातील चुलीतील आग वा-याने घरात पसरून सर्व घराला आग लागून घर जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तू , पैसे, दागिने, घरातील साहित्य सह जळून खाक झाले आहे. त्यामुळे सदरचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
हिवरे येथे परशुराम माने यांची तब्बल तीन एकर निसवलेली केळी भुईसपाट झाली आहे.

एकही झाड उभे राहिले नाही. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अरूण शिंदे, विशाल घाडगे, धनंजय अंकुश पाटील आदिंची केळीचे मोठे नुकसान झाले आहे.
दादासाहेब फरतडे या शेतक-यांच्या नारळाच्या झाडावर विज पडून झाड जळून गेले आहे.

तर आवाटी येथील जनार्दन ज्ञानदेव खांडेकर यांचा जनावराचा कोटा वादळी वाऱ्याने पडून यामध्ये अनेक जनावरे जखमी झाली आहेत असे खांडेकर यांनी बोलताना सांगितले आपणास शासनाच्या वतीने त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही त्यांनी बोलताना केली
या सर्व नुकसानीचा पंचनामा व्हावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यानी केली आहे.

हेही वाचा – पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

उमरड येथील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदित्य पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश मारकड यांची निवड

माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच आमदार संजय मामा शिंदे बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल तसेच जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी देखील करमाळा तालुक्यातील वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या पिकांचे तसेच घरांचे त्वरित शासनाने पंचनामे करावे अशी मागणी देखील केली आहे

हिवरे गावच्या इतिहासात नागनाथ महाराज मंदिरात सप्ताहात चौथ्या दिवशी अस्मानी संकट आले. चौथ्या दिवशी किर्तन सुरू होण्यापूर्वीच वादळी वा-याने व पाऊसाने संपुर्ण मंडप पडला.यावेळी शेकडो भाविक मंदिरात पळाल्याने बचावले. मंदिरासमोरील सर्व वाहने कोलमडली. सुमारे दिड तास वादळी वा-यांचे ताडंव चालू होते. वा-याने बापुसाहेब मगर यांचे शेड उडाले. दादासाहेब फरतडे यांच्या घरासमोरील नारळाचे झाड विज पडून जळाले.परशुराम माने,धनजंय पाटील , विशाल घाडगे आदि शेतक-यांची केळीचे प्रचंड नुकसान झाले. गाव शेतातील 90 टक्के आंब्याची फळे वादळाने खाली पडली.अनेक झाडे उन्मळून पडली.पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी .
….उमेश मगर, ग्राम पंचायत सदस्य, हिवरे,करमाळा

litsbros