करमाळाशैक्षणिक

“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

केत्तूर (अभय माने) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मॉनिटर या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या शाळेतील शिक्षकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत राज्यस्तरावरील पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या टॉप फिफ्टी शाळांमध्ये खातगाव नं.2 ही सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एकमेव प्राथमिक शाळा आहे. हा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथे होणार आहे.
कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय आजही टिकून आहे.

ही चुकीची सवय मोडून काढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना केवळ “मॉनिटरगिरी” करत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तीला जागीच चूक दर्शवून, अशी चूक करताना ठीक ठिकाणी थांबवले गेल्याने ही असामाजिक सवय मोडून निघेल अशी उपक्रमाची संकल्पना आहे.

PLC स्वच्छता मॉनिटर अभियानाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 5 डिसेंबर 2023 राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले.

दरम्यान प्रकल्प संचालक रोहित आर्या PLC स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर केल्या आहेत.

विद्यार्थ्यांने केलेली स्वच्छता मॉनिटरगिरी, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांना जागीच थांबवण्याच्या घटनेचे अनेक अनुभव सोशल मीडिया वर शेअर केले असल्याने राज्यातील टॉप 50 शाळांमध्ये खातगाव नं. 2 (ता करमाळा) शाळेची निवड झाली आहे. अभियानाच्या कालावधीत या शाळेतील विद्यार्थ्यांनी असंख्य वेळा कचऱ्याबाबत होणारा निष्काळजीपणा जागीच थांबवला.

त्यातील सुमारे 800 पेक्षा जास्त अनुभवांच्या विवरणाचे व्हिडिओ शेअर केले आणि राज्यात स्टॉप फिफ्टीमध्ये स्थान पटकावले. त्यामध्ये या शाळेतील विद्यार्थी स्वराज बोडखे, त्रिवेणी रणसिंग, नरेंद्र कोकाटे, यशराज कोकरे , सई तानवडे, संस्कार किर्ते, ज्ञानेश्वरी कोकाटे, सईराणी कुंढारे , सृष्टी गुळवे आणि या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करुन मोलाचे योगदान दिले.

या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्याचे तसेच त्यांच्या मनोगताचे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर अपलोड करण्याचे भरीव काम शाळा या शाळेचे स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचे समन्वयक तथा मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी केले.

त्यांनी वेळोवेळी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून, त्यांना प्रोत्साहित करून एवढ्या छोट्याशा शाळेमधून सुद्धा एवढे मोठे काम आपण उभे करू शकतो, आपले काम प्रामाणिकपणे केले तर तुम्ही कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या यश खेचून आणू शकता हे आपल्या या छोट्याशा शाळेतील बालचमुनासोबत घेऊन दाखवून दिले . या अंमलबजावणी मध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी आणि सहशिक्षक किरण जोगदंड यांनीही अनमोल सहकार्य केले.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात हिवरे, हिसरे,कोळगाव,सौंदे, भागात वादळी वा-याचा धुमाकूळ; तीन जनावरांचा विज पडून मृत्यू , लाखो रुपयांचे नुकसान: केळी बागा भुईसपाट

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल भिगवण ची 100% निकालाची परंपरा कायम ; ‘हे’ आहेत प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी

केवळ पहिली ते चौथी अशी शाळा असून देखील राज्यस्तरावरील बक्षीसावर आपले नाव कोरल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शि. वि.अ. सुग्रीव नीळ, जयवंत नलावडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा मोरे व सर्वसदस्य , शा. व्य. स.चे अध्यक्ष संतोष झेंडे व सर्व सदस्य, तसेच गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, पालकांनी आणि परिसरातील शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड तसेच सर्व विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले.

litsbros