केत्तुर गावामध्ये सद्गुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषीदुतांचे आगमन
केतूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील केत्तुर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषि महाविद्यालय, मिरजगाव येथील कृषि दुताचे आगमन झाले आहे यावेळी केत्तुर येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी कृषिदुतांचे उत्साहात स्वागत केले.
ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुत विविध विषयावर मार्गदर्शन, कृषि क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानविषयक, शेतकरी गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन व कृषि योजना याबद्दल विस्तार कार्य करणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने कृषिदुत विभूते राजवर्धन, तरंगे प्रतिक,लांडे सुरज, तावरे शिवराज, विभूते विशाल,वाघमोडे हनुमंत हे सहभागी असून सर्व विद्यार्थी दहा आठवडे केत्तुर गावामध्ये राहून विविध शेती विषयक प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी कृषी दुतानी उपस्थित ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश व रूपरेषा समजावून सांगितली.
यावेळी केत्तुर गावच्या सरपंचांनी गावची विस्तारित माहिती दिली व विद्यार्थ्याना सहकार्य करण्याचे आश्वासन देत सर्वगावकऱ्यांना आवाहन केले. तसेच ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्याच्या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी केत्तुर गावचे सरपंच श्री.सचिन विठ्ठल वेळेकर , उपसरपंच श्री.बाळासाहेब भगवान कोकणे ,
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा करमाळाकरांच्या वतीने शिवरत्न वर सत्कार; वाचा सविस्तर!
ग्रामसेवक श्री शरद जगदाळे साहेब ,कृषी सहाय्यक श्री.सिद्धार्थ शिंदे ,तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री.रविंद्र विघ्ने, ॲड. अजित विघ्ने,शहाजी पाटील, हनुमंत राऊत,बाळासाहेब जरांडे,शशिकांत काटकर व प्रगतशील शेतकरी श्री. संग्राम सूर्यकांत पाटील. उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषि दुतांना संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे व संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे, कार्यक्रम अधिकारी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Add Comment