करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

केळी पट्ट्यातील ढोकरी सबस्टेशनला मान्यता मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरूच; मा.आ.पाटील यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केळी पट्ट्यातील ढोकरी सबस्टेशनला मान्यता मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरूच; मा.आ.पाटील यांची माहिती

करमाळा(प्रतिनिधी आलिम शेख); ढोकरी सबस्टेशनला मान्यता मिळाली असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा चालू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी पुढे सांगितले की करमाळा तालुक्यातील उजनीकाठचा भाग हा ऊस, केळी उत्पादन करणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील वीजेची मागणी व प्रत्यक्षात होणारा वीज पुरवठा यात तफावत होती.

सन 2014 पासून आपण करमाळा मतदार संघासाठी वीजेच्या सुविधेबाबत सतत नवीन सबस्टेशनची विविध ठिकाणी निर्मीती व्हावी म्हणून मागणी करत आलो. वांगी परिसरात ढोकरी येथे 33/11 केव्हीए क्षमतेचे नवीन सबस्टेशन झाल्यास या भागातील वीजेचा प्रश्न कायमचा सुटला जाईल तसेच ढोकरी येथील नवीन सबस्टेशन मुळे जवळपासच्या इतर 33/11 केव्हीए सबस्टेशनवर असलेला अतिरिक्त भार कमी होणार आहे.

यामुळे आपण सदर सबस्टेशन हे इन्फ्रा 2 मधून उभारले जावे अशी मागणी लावून धरली. या कामाचा आपण सतत पाठपुरावा करत राहीलो. या पाठपुराव्यास अखेर यश आले असून आर.डी.एस.एस या योजनेतून ढोकरी 33/11kva सब स्टेशनला मंजूरी मिळाली आहे.

यापुढील कामकाजासाठी आपण महावितरणचे मयूर भरणे,कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनीअर विभाग )सोलापूर यांचेशी बोललो आहे. यानंतरच्या जागा उपलब्धता, निधी, उभारणी आदि कामासाठी आपण स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करणार आहोत. शेतकर्‍यांच्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सतत पुढाकार घेत आलो.

वेळप्रसंगी शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा करायला धजावलो नाही. आगामी काळात सुद्धा करमाळा मतदार संघातील वीजेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण शासनदरबारी आपली मागणी व त्यास पुरक पाठपुरावा करतच राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

तर सन 2014 मध्ये माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदार संघातील वीजेच्या प्रश्नांची कायमची सोडवणूक करण्यासाठी एक पायाभुत आराखडा तयार केला. यामध्ये 33/11 केव्हीए उपवीजकेंद्र, 220 केव्हीए वीजकेंद्र तसेच क्षमतावाढ करण्यासाठी 5 आणि 3 एमव्हीचे नवीन फिडर, एल टी लाईन, ट्रान्सफॉर्मर आदिंचा समावेश आहे.

सदर आराखडा महावितरणच्या संचालक तसेच कार्यकारी संचालक यांचेकडेही सादर केला असून त्यानूसारच सर्व कामांचा पाठपुरावा आजही ते करत आहेत. सन 2015 मध्ये वांगी नं 1 येथे महावितरणच्या नवीन फिडर उद्घाटन कार्यक्रमात माजी आमदार नारायण पाटील यांनी ढोकरी येथे नवीन सबस्टेशन उभारण्याची संकल्पना जाहीर सभेत मांडली.

हेही वाचा – गावच्या सूनबाईची गावात पोस्ट मास्तर म्हणून नेमणूक; निंभोरेकरांनी केला सन्मान

करमाळा तालुक्यातील ‘या’ प्रश्नासाठी मे महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार; पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांनी पाठपुरावा चालू ठेवला व आता हा प्रश्न सुटल्याने अनेक शेतकरी माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

litsbros

Comment here