करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ‘या’ प्रश्नासाठी मे महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार; पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ प्रश्नासाठी मे महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार; पालकमंत्री
विखे पाटील यांचे आश्वास

केतूर (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व उप जिल्हाप्रमुख प्रमुख महेश चिवटे प्रमुख अनिल पाटील उपशहर प्रमुख नागेश गुरव यांनी निवेदन दिल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मे महिन्यात मंत्रालयात या संदर्भात बैठक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना जातेगाव टेंभुर्णी भूसंपादन विजेचे रखडलेले प्रश्न
करमाळा नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचा प्रकल्पास मंजुरी देणे,केळीसंशोधन प्रकल्पास मान्यता देणे,करमाळा नगरपालिका इमारत वाढीव निधी कुकडी प्रकल्पातील साऱ्यांची रखडलेली कामे पूर्ण करणे ,

हेही वाचा – उजनीची वाटचाल मायनस कडे, शेतकरी चिंताग्रस्त; उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा; दररोज होतेय १% पाणी कमी

घारगावच्या सरपंच श्रीमती लक्ष्मी सरवदे या डॉ. बी.आर.आंबेडकर रत्न अवार्ड 2023 पुरस्काराने सन्मानित

कुकडी प्रकल्पात भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे अश्या 15 प्रश्नावर मंत्रालयात बैठक लावण्याची लेखी पत्र जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिले.

मे महिन्यात या सर्व प्रश्नांवर मंत्रालयात बैठक लावण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

litsbros

Comment here