करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी

केत्तूर (अभय माने ) करमाळा तालुक्यातील पश्चिम भागासह उजनी लाभक्षेत्र परिसरात शुक्रवार (ता.28) रोजी जोरदार अवकाळी पाऊस, गारपीट वादळी वारे यामुळे फळबागांची मोठी नुकसान केले आहे.त्यामुळे फळबाग उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.

याबाबतीत सरकारी काम आणि सहा महिने थांब. अशी परिस्थिती होऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अड.अजित विघ्ने यांनी केली आहे.

परिसरातील वाशिंबे, सोगाव, गोयेगाव, कुंभारगाव, चिकलठाण, शेटफळ, पोफळज, परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारे व अवकाळी पावसाने शेतातील फळबागांचे मोठ नुकसान केली आहे.

परिसरात ऊस पिकाला फाटा देऊन शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या आहेत या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु,प्रतिक्षा विकास कळसाईत हिची एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती साठी निवड

वेताळ साहेबांच्या नावानं चांगभलं च्या गजरात फिसरे गावची वेताळ साहेब यात्रा उत्साहात संपन्न

गावरान आंब्यांची संख्या वरचेवर कमी होत असताना या वादळाने झाडाला आलेला आंबा सर्व गळून पडल्याने यावर्षी गावरान आंबा खायला मिळणार नाही अशी परिस्थिती आहे या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.

litsbros

Comment here