कौतुकास्पद: केम येथे ए पी ग्रुपच्या वतीने १ जून रोजी गावातील १०१ जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस एकत्रितपणे उत्साहात साजरा; ज्येष्ठांना काठ्यांचे वाटप
केम (प्रतिनिधी संजय जाधव);
केम ता करमाळा येथील ए,पी, ग्रुप व उद्योजक आजीनाथ लोकरे यांच्या सहकार्याने १ जून शासकीय वाढदिवस आगळया वेगळया पध्दतीने साजरा करण्यात आला या निमीत्त १०१जेष्ट नागरिक व महिला यांचा फेटे बांधून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा वाढदिवस केक कापून मोठया उत्साहात साजरा केला व त्याना म्हतारपणी आधार म्हणून काटयाचे वाटप करण्यात आले.
तसेच आदर्श माता म्हणून साखरबाई मारूती लोकरे यांचा ए,पी,ग्रुपचे वतीने सत्कार करण्यात आला कठिण असा गरीबीची परिस्थिती वर मात करीत आपल्या मुलाला उद्योजक बनविले या बद्ल त्यांचा गोरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी माजी संचालक गोरख आपा जगदाळे या वेळी व्यासपीठावर करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष वारे संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष नितीन खटके, विष्णू पारखे बापुराव तळेकर होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पवार यानी केले.
या वेळी संतोष वारे म्हणाले आमच्या सारख्या छोट्या कार्य कत्याला जेष्ट नागरिकांच्या सोहळाला उपस्थितीत राहता आले.
हे आमचे भाग्य या कार्यक्रमासाठी महेश तळेकर सर ए,पी, ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील पै महावीर आबा तळेकर विजय ओहोळ युवराज तळेकर, संदिप तळेकर विष्णू तात्या अवघडे,कुंडलिक तळेकर बापुराव धाडस तळेकर, वसंत तळेकर सुरेशं गुटाळ पिनू तळेकर पांडुरंग तळेकर राहुल तळेकर रमेश तळेकर सागर राजे तळेकर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले.
तर आभार विजयसिंह ओहोळ यानी मानले या उपक्रमाचे केम व परिसरातील ज्येष्ठ नागरिकानी कौतुक केले तसेच जेष्ठ नागरिक आनंदात दिसले या ग्रुपच्या उपक्रमाचे ईतरानी आदर्श घेण्यासारखा आहे.
Add Comment