क्राइमसोलापूर

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी;अवैध घरगुती गॅस पॉईंटवर छापा, केला ‘एवढ्या’ किमतीचा मुद्देमाल हस्तगत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी;अवैध घरगुती गॅस पॉईंटवर छापा,
केला ‘एवढ्या’ किमतीचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर: दिनांक 21/05/2023 रोजी पोउपनि/सुबोध जमदाडे व त्याचे पथक सोलापूर येथील कार्यालयात हजर असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे मुळेगाव येथील धवल नगर, एका घरामध्ये एक इसम हा बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरचा साठा बाळगुन सिलेंडर मधील गॅस इलेक्ट्रीक मोटारच्या साहयाने रिक्षामध्ये भरत असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमी पोउपनि/ जमदाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  सुहास जगताप यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

सदर बातमीचे ठिकाणी आले नंतर तेथे एका घरासमोरील अंगणात एका पाठीमागे एक अशा एकुण तीन रिक्षा उभ्या होत्या त्यापैकी समोरील एका रिक्षामध्ये एक इसम इलेक्ट्रीक वजन काटयावर गॅस सिलेंडर उलटे ठेवुन इलेक्ट्रीक मोटारीला असलेल्या दोन पाईपच्या सहायाने रिक्षा मध्ये घरगुती गॅस भरत असताना दिसला. तो इसम व गॅस भरत असलेल्या रिक्षाचा रिक्षा चालक हे दोघे पोलीस पथकास पाहुन पळुन गेले. सदर ठिकाणाहुन 3 घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या, 1 इलेक्ट्रीक मोटार, 1 इलेक्ट्रीक वजन काटा, तसेच सदर घरासमोर अंगणात गॅस भरण्याकरीता आलेल्या 3 अॅटो रिक्षा इत्यादी साहित्यासह एकुण 3,86,000/- रू. किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर ठिकाणी रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी आलेले रिक्षा चालक व बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरचा साठा बाळगणा-या एकुण 4 इसमा विरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरंन 323/2023 भादंवि क. 285, 286, 287, 34 व जिवनावष्यक वस्तु कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 हेही वाचा – तालुक्यातील प्रत्येक गावाने आदर्श घ्यावा अशी बातमी; लोकवर्गणीतून उभारलेल्या वाचनालयामुळे पूर्व सोगावमधील नऊ तरुण झाले पोलीस भरती

करमाळा येथील महिला नेत्या ॲड सविता शिंदे यांचा करमाळा ते कर्नाटक प्रवास! विधानसभा निवडणुकीत ज्यांचा प्रचार केला ते पाटील झाले चौथ्यांदा आमदार; नक्की वाचा ॲड.शिंदे यांचा अनुभव!

ही कामगिरी पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक, हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली, वरीश्ठ पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, स्था.गु.शा, यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक सुबोध जमदाडे, पोहेकॉ/परशुराम शिंदे, पोकॉ/अजय वाघमारे, यश देवकते, चापोकॉ/रामनाथ बोंबीलवार यांनी बजावली आहे.

litsbros

Comment here