करमाळा येथील वादग्रस्त व्हॉट्सॲप पोस्ट प्रकरणी ‘त्या’ ग्रुप ॲडमिनला अतिरिक्त सत्र न्यायालयाचा दिलासा
करमाळा(प्रतिनिधी); -दिनांक 12/06 /2023 रोजी करमाळा येथील श्याम परशुराम सिंधी राहणार खडकपुरा तालुका करमाळा याने त्याचे मोबाईल नंबर वरून करमाळा समाजकारण या व्हाट्सअप ग्रुप वर एक आक्षेपार्य पोस्ट केली होती व सदर ग्रुपचे ॲडमिन नितीन आढाव पाटील यांचे सह शाम परशुराम सिंधी या दोघांवर करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणी श्याम परशुराम सिंधी यास अटक करण्यात आली असून सध्या त्यास पोलिस कस्टडी देण्यात आलेले आहे.
तर यातील ग्रुप ॲडमिन नितीन आढाव यांनी एडवोकेट निखिल पाटील व अडवोकेट सुहास मोरे यांचे मार्फत अटकपूर्व जामीन मिळणे कामी अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे धाव घेतली होती. सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री जे .सी .जगदाळे साहेब यांच्यासमोर झाली.
सदर जामीन अर्जाचे सुनावणी वेळी एडवोकेट निखिल पाटील यांनी यातील ग्रुप ॲडमिन नितीन आढाव यांनी कोणतीही आक्षेपार्य पोस्ट केलेली नसून त्यास कोणताही दुजोरा दिलेला नाही, तसेच त्यांना सदर घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी श्याम सिंधी यांना ग्रुप मधून रिमूव केलेले आहे.
ते तपास कार्यात मदत करण्यास तयार असून त्यांना अटक करण्याची कोणतीही आवश्यकता नाही असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून नितीन आढाव यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. सदर प्रकरणी आरोपीतर्फे एडवोकेट निखिल पाटील एडवोकेट सुहास मोरे व ॲडव्होकेट दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.
Add Comment