करमाळाराजकारण

करमाळा व जेऊर बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्याची मागणी; मंत्री तानाजी सावंत यांना दिले निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा व जेऊर बस स्थानकाचे
विस्तारीकरण करण्याची मागणी; मंत्री तानाजी सावंत यांना दिले निवेदन

करमाळा (प्रतिनिधी);
करमाळा एसटी बस स्थानकाची जवळपास सहा एकर जमीन मोकळी असून यावर एसटी महामंडळाने बांधा चालवा हस्तांतरित करा या तत्त्वावर व्यापारी संकुल बांधून बस स्थानकाचे विस्तारीकरण करावे त्याचप्रमाणे जेऊर येथील बस स्थानकाचे सुशोभीकरण करणे यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे गेले.

तात्काळ आरोग्यमंत्री सावंत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तात्काळ या प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली आहे

करमाळा शहराच्या मध्यवस्तीत एस टी महामंडळाची कोट्यावधी रुपयांची जमीन पडीक आहे या जमिनीवर चारी बाजूने सुमारे 300 ते 400 व्यावसायिक गाळे दोन मजली इमारत करून होऊ शकतात
सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची साधन मिळेल शिवाय एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल.


पंढरपूर इंदापूर या ठिकाणी ज्या पद्धतीने बांधा चालवा हस्तांतरित करा या योजनेत एसटी महामंडळाचे बस स्थानकाचे विस्तारीकरण झाले आहे.

बार्शी बस स्थानकाचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव ही मंजूर झालेला आहे त्याच पद्धतीने करमाळा व जेऊरला प्राधान्याने व स्थानक विस्तारीकरण व व्यवसाय गाडी उभारण्याला मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली.

करमाळा बस डेपो साठी नवीन वीस बस उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे.

litsbros

Comment here