करमाळाराजकारण

ऊसतोड मजुरांचे अवकाळी पावसात झालेल्या नुकसान भरपाईची मागणी; करमाळा तहसीलदारांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ऊसतोड मजुरांचे अवकाळी पावसात झालेल्या नुकसान भरपाईची मागणी; करमाळा तहसीलदारांना निवेदन

केतूर ( अभय माने ): अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊसतोड मजुरांचे पंचनामे करून यांना तात्काळ भरपाई देण्याची करमाळा तहसीलदार यांचे मार्फत महसूल मंत्री यांना निवेदन पाठवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यशवंतभाऊ गायकवाड यांनी केली मागणी.

पुढे निवेदनामध्ये गायकवाड म्हणाले गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरामध्ये कोविड 19,(कोरोना) सारख्या महामारीने थैमान घातल्यामुळे ,हवालदिल झालेला मुजुर आता कुठे कामाला लागला होता.

तोच अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील , करमाळा तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये ता 1 डिसेंबर रोजी रात्री, अचानक झालेल्या पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्यामुळे त्याच्या अन्नधान्याचे , संसार उपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे लहान मुले वयवृध्द व स्त्री-पुरुष मजुरांचा निवार्याबरोबर अन्नधान्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

याची शासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त भागातील मजुरांचे पंचनामे करून भरपाई देण्याची,व वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे ऊसतोड मजुरांची लहान मुले व वयवृध्द मजुरांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यासाठी प्राथमीक उपाययोजना म्हणून प्रत्त्येक साखर कारखान्यावर फिरते अरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली, त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ता.अध्यक्ष अर्जुनराव गाडे, कामगार संघटनेचे दादा शेलार,अकाश शेलार,मजुर संघटनेचे डॉ किरण गायकवाड उपस्थित होते.

litsbros

Comment here