करमाळा

आवाटी येथील विधीज्ञ ॲड.अलीम पठाण यांचा ‘कर्तव्यनिष्ठ वकील’ म्हणून कृषी महोत्सवात नागराज मंजुळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन झाला सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी येथील विधीज्ञ ॲड.अलीम पठाण यांचा ‘कर्तव्यनिष्ठ वकील’ म्हणून कृषी महोत्सवात नागराज मंजुळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन झाला सन्मान

करमाळा(प्रतिनिधी-अलीम शेख); करमाळा तालुक्यातील आवाटी येथील नामवंत विधीज्ञ एडवोकेट अलीम हाजी हमजेखान पठाण यांचा वकिली क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ वकील म्हणून कामगिरी करीत असल्याबद्दल त्यांचा कृषी महोत्सवामध्ये मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

आवाटी तालुका करमाळा येथील विधीज्ञ ऍडव्होकेट पठाण हे गेली कित्येक वर्षापासून करमाळा येथील न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत असून त्यांनी वकिली व्यवसाय मध्ये कर्तव्यनिष्ठ वकील म्हणून कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री कैलासवासी दिगंबरराव बागल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कृषी महोत्सवांमध्ये एडवोकेट पठाण यांचा सैराट फेम नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पठाण यांचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दीपक आबा साळुंखे, सांगोला माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे, साठपे साहेब मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय उर्फ प्रिन्स बागल, तसेच युवा नेत्या रश्मी बागल, प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक दास सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे सह प्राध्यापक संजय चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 यावेळी कृषी, शेती, सामाजिक, पत्रकारिता, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शनाचे कामकाज युवा नेते दिग्विजय बागल यांनी मानले.

 एडवोकेट अलीम पठाण यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार झाल्याबद्दल करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट विकास जरांडे तसेच उपाध्यक्ष एडवोकेट प्रमोद जाधव व सर्व सदस्य यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

litsbros

Comment here