मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावे; करमाळा सकल मुस्लिम समाजाची महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
करमाळा (प्रतिनिधी आलीम शेख); मराठा समाजा बरोबर मुस्लीम समाजाला सुद्धा आरक्षण मिळावे अशी मागणी सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या तर्फे तिचा निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारला केली आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील साहेब यांना महाराष्ट्र राज्य सरकारने दोन महिन्यांयाचा अवधी मिळावा म्हणून विनंती केली व महाराष्ट्र सरकार येत्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ठराव मंजूर करु असे ठोस आश्वासन दिले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही संबंध मुस्लीम समाजाची सुद्धा मागणी असुन महाराष्ट्रातील तमाम मुस्लीम समाजाने ज्या ज्या वेळी मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन केली आहे त्या त्या वेळोवेळी पाठिंबा दर्शविला आहे .
महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाला हायकोर्टाने शैक्षणिक व नौकरी विषयक आरक्षण तात्काळ लागू करावे असे महाराष्ट्र राज्य सरकारला सांगितले आहे कारण महाराष्ट्रातील मुस्लीम समाज हा मागासलेला असून मुस्लीम समाज हा शैक्षणिक व आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असुन अत्यंत हालाखीची जीवन तो जगत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
मुस्लीम समाजाला इतर समाजा बरोबर योग्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक आयोग नेमले गेले व प्रत्येक आयोगाचा निष्कर्ष हाच होता की मुस्लीम समाज हा शैक्षणिक व आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असुन त्यांना आरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुस्लीम समाजाला ख-या अर्थाने आरक्षणाची गरज असुन न्यायपालिका ने सुद्धा मुस्लीम समाजाला ५% शैक्षणिक व नौकरी विषयक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त तो महाराष्ट्र राज्य सरकारने अंमलात आणावा व मराठा समाजा बरोबर मुस्लीम समाजाला सुद्धा आरक्षण जाहीर करावे व दिवाळीची ही भेट दोन्ही समाजाला द्यावी अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या तर्फे महाराष्ट्र राज्य सरकारला एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
Add Comment