करमाळा शेती - व्यापार

उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू; शिंदे बंधूंच्या प्रयत्नाला यश 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू; शिंदे बंधूंच्या प्रयत्नाला यश 

करमाळा (प्रतिनिधी); उजनी धरणातील पाण्याचे सन 2023-24 रब्बी हंगामासाठी चे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली आज ठरवण्यात आले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. यानुसार फेब्रुवारी 24 अखेर रब्बी हंगामात कालवा आणि बोगदा- सीना नदी, पाण्याची दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत व यातील पहिले आवर्तन शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याचे आमदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले .

बैठकीस आमदार संजय मामा शिंदे ,आमदार सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ ,कार्यकारी संचालक अतुल कपोले अधीक्षक अभियंता धीरज साळे रावसाहेब मोरे ,बागडे कार्यकारी अभियंता जाधवार, माने, हरफुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

    सन 2023 च्या पावसाळ्यात कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे उजनीच्या वरील लहान-मोठी 19 धरणे 95 ते 100% भरली व यातून पुढे आलेल्या पाण्यामुळे 15 ऑक्टोबर 23 रोजी उजनीत

 60.66% पाणी तर 96.54 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला होता. आज तीन नोहोंबर रोजी धरणात 54.35 टक्के पाणी तर 92.80 टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. 

     अधिक माहिती अशी की, कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये कालवा आणि बोगदा यातून पहिले आवर्तन चार नोव्हेंबर पासून तर दुसऱे आवर्तन फेब्रुवारी अखेर दरम्यान सोडण्याचे ठरले. हे आवर्तन आता प्रत्येकी 40 दिवसाचे राहणार असून शेतीसाठी रब्बी हंगामातील पाणी उपलब्ध होणार आहे. नियोजनानुसार कालव्यातून सुरुवातीला 2500 क्युसेक्स तर बोगद्यातून सुरुवातीला 750 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे, उन्हाळी हंगामासाठी तिसरे आवर्तन चे नियोजन फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध असलेल्या उजनीतील पाणी साठ्यावर अवलंबून राहणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले .,एकंदरीत शेतीसाठी रब्बी हंगामात दोन पाळ्या सोडण्यात येणार आहेत .

 प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या शेवटी 15 ऑक्टोबर रोजी उजनी धरणात 111 टक्के पाणी व 123 टीएमसी पाणीसाठा केला जातो परंतु उजनी धरणाच्या मागील 42 वर्षातील इतिहासात उजनी 100% न भरण्याची ही नववी वेळ आहे तरीपण आहे या उपलब्ध पाण्यातून शेतीसाठी दोन रब्बीची आवर्तने निश्चित मिळतील हे आता स्पष्ट झाले आहे. 

आ. बबनदादा शिंदेंच्या प्रयत्नाला यश

 मागील 20 23 च्या पावसाळ्यात उजनी धरणात 26 टक्के पाणीसाठा झाला होता व सोलापूर जिल्ह्यात पाऊसच नव्हता त्यावेळे पासून आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतीसाठी कालवा व बोगद्यातून पाण्याची मागणी केलेली होती. 

नुकतेच मागील 12-13 दिवसापूर्वी पिण्यासाठी म्हणून कालव्यातून पाणी सोडण्यात आले व करकंब येथील पाण्याचा टॅंक व आष्टी तलावात पाणी सोडण्यात येऊन सभोवतालच्या आठ ते दहा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला.

… कालव्यातून पाणी सोडण्या संदर्भात कालवा सल्लागार समितीची तातडीची बैठक बोलण्यात देखील आमदार बबनदादा शिंदे यांचाच पुढाकार होता, अखेर दादांच्या प्रयत्नाला आज यश आले आहे व यामुळे कालवा आणि बोगदा याद्वारे लाखो एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे हे निश्चित.बोगद्यावरील लाईट बंद होणार नाही; आ.संजय मामा शिंदे यांच्या मागणीला यश

   आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भीमा सीना जोड कालवा अर्थात बोगदा यातून पाणी सोडल्यानंतर शेतीसाठी वीज पुरवठा बंद करू नये अशी खास मागणी आमदार संजय मामा शिंदे यांनी केली होती, त्यांच्या मागणीला पालकमंत्री यांनी दूजोरा देऊन बोगद्यावरील लाईट बंद न करण्याचा आदेश पारित केला.

   उजनीतून पहिले आवर्तन सोडल्यामुळे उजनी खालील भागातील विशेषता माढा सोलापूर टेंभुर्णी कुर्डूवाडी आदि भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!