ऊजनी धरण प्लस मध्ये आहे, तरीही नियोजना अभावी जनतेला पाणी मिळत नाही; लोकांना कॉलरा होण्याची वाट बघताय का; आ. प्रणिती शिंदे यांचा मोर्चात सवाल
सोलापूर: सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावे या मागणीसाठी हंडा नाद आंदोलन करण्यात आले.सोलापुर शहरात गेल्या अनेक महिन्यापासुन पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, अनेक भागात गढुळ, अपुरा, वेळी अवेळी पाणी पुरवठा होत आहे या विरोधात आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी, कुंभकर्णी झोप घेतलेल्या सत्ताधारी भाजप आणि महानगपालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी सोलापुर महापालिकेसमोर हंडा नाद आंदोलन केले.
यावेळी जोरजोरात हंडा नाद करत पाणी न देणाऱ्या मुर्दाड सो.म.पा. प्रशासन आणि भाजपचा धिक्कार असो, पाणी दया नाही तर खुर्च्या खाली करा, सो. म. पा. प्रशासन हाय हाय, भाजपा सरकार हाय हाय अश्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येऊन सोलापुर महानगपालिका प्रशासन आणि भाजपा सरकार यांचा निषेध करून सोलापुर महानगपालिका आयुक्तांना पाणी पुरवठा सुरळीत करावे या माग़णीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाले की, सोलापुरचा पाणीप्रश्न खुपच तीव्र झाला आहे सहा ते सात दिवसांनी ते गढुळ पाणी येत आहे. उन्हाळा तीव्र झाला असुन नियोजन नाही. पाणी प्रश्नाबाबत प्रशासन गंभीर नाही. यामुळे रामवाडीत दोघे अँडमिट झाले आहेत.
प्रशासन कॉलरा होण्याची वाट बघतोय का? तसेच मुंबईत ऊष्माघातामुळे तेरा जण मरण पावले त्यांची वाट बघतेय का? उजनी धरण प्लस मध्ये आहे तरीही नियोजनाअभावी पाणी मिळत नाही. म्हणून मी शासनाचा निषेध करते. कारण महापालिकेत नगरसेवक महापौर नाहीत प्रशासनावर कोणाचे वचक राहिले नाही. ते असते तर ही परिस्थिती आली नसती. पण लोकांचा कल भाजपा आणि शिंदे गटाच्या विरोधात आहे म्हणून निवडणुका घेत नाहीत. लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे.
म्हणून महानगपालिका निवडणूक लवकर घ्या आणि नगरसेवक महापौर आणा. अनेक ठिकाणी गढुळ पाणी येत आहे. सहा ते सात दिवसांनी पाणी येत आहे. पाणी प्रश्न गंभीर आहे म्हणून प्रशासनाने नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत करा. पाणी पुरवठा वेळापत्रक घंटागाडीच्या माध्यमातून जाहिर करा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल
या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सचिव अलकाताई राठोड, मनीष गडदे, प्रा.नरसिंह आसादे, मा. नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, नगरसेविका फिरदोस पटेल, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, डी ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, अश्विनी जाधव, सिद्राम अट्टेलुर, मधुकर आठवले, जेम्स जंगम, भोजराज पवार, हरून शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, सुशील बंदपट्टे, डॉ. आप्पासाहेब बगले, शिवशंकर अंजनाळकर, राजन कामत, अशोक कलशेट्टी, तिरुपती पंरकीपंडला, चक्रपाणी गज्जम,
प्रवक्ते नागनाथ कदम, हासिब नदाफ, परिवहन सेल अध्यक्ष वशिष्ठ सोनकांबळे, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, अरुणा वर्मा, प्रमिलाताई तूपलवंडे, संध्या काळे, दशरथ गायकवाड, अनिल जाधव, श्रीकांत वाडेकर, हणमंतु सायबोळू, राहुल वर्धा, शौकात पठाण, कुणाल गायकवाड, दीनानाथ शेळके, जितू वाडेकर, प्रकाश गेंट्याल, दिनेश म्हेत्रे, आप्पा सलगर, नूरअहमद नालवार, रमेश फुले, रजाक कादरी, कय्युम बलोलखान, राजेश झंपले, लखन गायकवाड, सुभाष वाघमारे, विवेक कन्ना, संजय गायकवाड,
राजेंद्र शिरकुल, विवेक इंगळे, नासिर बंगाली, शोएब कडेचुर, सुशीलकुमार म्हेत्रे, समीर काझी, धीरज खंदारे, दिनेश डोंगरे, मनोहर चकोलेकर, विजय साळुंखे, ज्ञानेश्वर जाधव, मुमताज तांबोळी, चंदा काळे, शिल्पा चांदणे, रेखा बिनेकर, अरुणा बेंजरपे, सुनीता बेरा, मीरा घटकांबळे, प्रभावती लोंढे, संघमित्रा चौधरी, नीता बनसोडे, लता सोनकांबळे, मुमताज शेख, सविता सोनवणे, स्नेहल शिंदे, नागनाथ शावणे, नरसिंग गोरे, श्रीनिवास सायलो, संदिपन सोनवणे, श्रावण सोनवणे, भालचंद्र कांबळे, भाग्यश्री कदम, मनीषा साठे, राधा मोरकडे, मनीषा मिस्कीन, अन्नपूर्णा माचर्ला, भुवनेश्वरी संकण्णा, लक्ष्मी भैरी, अंजली कोळी, मंजू रंगापुरे, तेलंगी रणशुंगे, ललिता माचर्ला, विद्या पवार, शितल पवार, रेणुका सुमनार, रूपाली देशमुख, सोनाली देशमुख, कांता पवार यांच्यासह हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित होते.
Comment here