करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा पोलिसांच्या वतीने मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा पोलिसांच्या वतीने मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत

करमाळा(प्रतिनिधी); “रमजान ईद” निमित्त ईद ची नमाजपठण करण्यासाठी आलेले मुस्लिम बांधवांना करमाळा पोलीस स्टेशन चे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल हिरे साहेब व पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी येणारे प्रत्येक मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

रमजान च्या महिन्यात करमाळा शहरातील व तालुक्यातील सर्व सण, उत्सव आनंदमयी व हर्ष उल्लास वातावरणात पार पाडुन करमाळा शहरातील सामाजिक वातावरण चांगले ठेवल्याबद्दल ईदगाह मैदान वर नमाज अदा केल्यानंतर भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे मुस्लिम पद्धतीने जाहीर सत्कार करमाळा शहर काझी कलीम काझी सर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

हेही वाचा – करमाळा शहरासाठी 6 कोटी वीस लाखाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर; वाचा सविस्तर

ऊजनी धरण प्लस मध्ये आहे, तरीही नियोजना अभावी जनतेला पाणी मिळत नाही; लोकांना कॉलरा होण्याची वाट बघताय का; आ. प्रणिती शिंदे यांचा मोर्चात सवाल

यावेळी शहर काझी मौलाना मुस्ताक काझी सर व मुजाहिद काझी,भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, अशपाक सय्यद पत्रकार,अलीम शेख पत्रकार, ,पिंटु शेठ बेग, सुरज शेख, आझाद शेख, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, इम्तियाज पठाण व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

litsbros

Comment here